Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SL: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज! गॉलमध्ये पोहोचताच गिलसेनेचं दिमाखात स्वागत; श्रीलंकेविरुद्ध महामुकाबला

IND VS SL First Test Match At Galle: श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. त्याआधी टीम इंडिया गॉलमध्ये दाखल झाली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 13, 2026 | 07:55 PM
IND vs SL: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज! गॉलमध्ये पोहोचताच गिलसेनेचं दिमाखात स्वागत; श्रीलंकेविरुद्ध महामुकाबला
Follow Us
Follow Us:
  • पहिल्या कसोटीसाठी टीम इंडिया सज्ज
  • भारत- श्रीलंका पहिला कसोटी सामना
  • गॉलमध्ये पोहोचताच गिलसेनेचं दिमाखात स्वागत
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आधीच कोलंबोला पोहोचला. जिथे संघाने तीन दिवसीय सराव सामना खेळला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा ६ विकेट्सने धुव्वा उडवला. आता खऱ्या कसोटीची वेळ आली आहे. १५ ऑगस्ट रोजी भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिला सामना खेळला जाईल. यासाठी संघ गॉलमध्ये दाखल झाला आहे. भारतीय खेळाडूंचे फुलांच्या माळा घालून भव्य स्वागत करण्यात आले. बीसीसीआयने स्वतः याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान, श्रीलंकेनेही आपला संघ जाहीर केला आहे.

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

भारत- श्रीलंका पहिला कसोटी सामना

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना १५ ऑगस्ट रोजी रंगणार आहे. भारतीय संघ गॉलमध्ये दाखल झाला असून, त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. संघ १२ ऑगस्टच्या संध्याकाळी तिथे पोहोचला आणि त्यानंतर लगेचच काही खेळाडूंनी तयारी सुरू केली. दरम्यान, सर्वांचे लक्ष येथील खेळपट्टीवर लागले आहे. श्रीलंकेच्या खेळपट्ट्या फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल म्हणून ओळखल्या जातात. यावेळीही तीच परिस्थिती कायम राहिल्यास, संघ आपल्या फिरकी गोलंदाजांना तयार ठेवण्याचा प्रयत्न करेल.

Colombo 🚌 Galle#TeamIndia have arrived for the #SLvIND Test series opener 🙌 pic.twitter.com/UXoo0gTzCv — BCCI (@BCCI) August 12, 2026

भारतीय संघाचे कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष

शुभमन गिलच्या कर्णधारपदाखाली भारतीय संघ गेल्या काही काळापासून संघर्ष करत आहे. त्यामुळे ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. यावेळी श्रीलंकेच्या संघात प्रभात जयसूर्यासारखे गोलंदाज आहेत, जे भारतीय संघासाठी निश्चितच अडचणी निर्माण करू शकतात. परंतु, सामन्याला दोन दिवस शिल्लक असल्याने, खेळपट्टीचे निरीक्षण करून भारताला तयारीमध्ये सुधारणा करण्याची ही एक संधी असेल.

हे सामने WTC च्या अंतर्गत

ही मालिका जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा भाग म्हणून खेळवली जाणार आहे. भारतीय संघ सध्या डब्ल्यूटीसी गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर आहे. मात्र, जर त्यांनी ही मालिका जिंकली, तर त्यांना पुढील फेरीत जाण्याची संधी आहे. त्यामुळे ही स्पर्धा अत्यंत चुरशीची होण्याची अपेक्षा आहे. कोणता संघ ही मालिका जिंकेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

श्रीलंकेचा संघ: धनंजया डी सिल्वा (कर्णधार), लाहिरू उदारा, निशान मदुष्का, कामिंदू मेंडिस (उप-कर्णधार), दिनेश चांदिमल, पसिंदू सूरियाबंदरा, सोनल दिनुशा, निरोशन डिकवेला (यष्टीरक्षक), रमेश मेंडिस, प्रभात जयसूर्या, केशर नुवांथा, मिलन रथनायके, असिथा फर्नांडो, लाहिरू कुमारा, विश्व फर्नांडो, दिलशान मदुश्का

भारताचा संघ : शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन, आकिब नबी, सरफराज खान

Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट

Web Title: India vs sri lanka 1st test team india galle shubman gill

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 07:53 PM

Topics:  

  • IND vs SL
  • Shubhman Gill
  • Sri Lanka cricket
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया हरली तरी Gautam Gambhir यांची खुर्ची कायम? BCCI चा मोठा निर्णय
1

IND vs SL: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडिया हरली तरी Gautam Gambhir यांची खुर्ची कायम? BCCI चा मोठा निर्णय

Ajinkya Rahane: निवृत्तीनंतर काही दिवसातच मिळाली दुसरी नोकरी, आता अजिंक्य रहाणे दिसणार ‘या’ रुपात
2

Ajinkya Rahane: निवृत्तीनंतर काही दिवसातच मिळाली दुसरी नोकरी, आता अजिंक्य रहाणे दिसणार ‘या’ रुपात

IND vs SL Test: भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ जाहीर! मेंडिस-निसांका बाहेर; ३ वर्षांनी ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक
3

IND vs SL Test: भारताविरुद्ध श्रीलंकेचा संघ जाहीर! मेंडिस-निसांका बाहेर; ३ वर्षांनी ‘या’ स्टार खेळाडूचे कमबॅक

King Kohli चा रेकॉर्ड धोक्यात! Shubman Gill रचणार WTC मध्ये इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरणार
4

King Kohli चा रेकॉर्ड धोक्यात! Shubman Gill रचणार WTC मध्ये इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.