
ind vs sl
भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 503 रन्सचा डोंगर उभा केला होता. त्यामध्ये ऋषभ पंत, कर्णधार शुभमन गिल यांनी शानदार अर्धशतकी खेळी केली होती. तर देवदत्त पडीकल आणि ध्रुव जुरेलने शतकी खेळी करत भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभी करून दिली. त्यानंतर भारतीय संघाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत श्रीलंकेचा सुपडासाफ केला आहे.
503 रन्सचा पाठलाग करण्यासाठी श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला. लाहिरू उदारा शून्यावर आउट झाला. तर कामिल मिशाराने 19 रन्स केल्या. तर प्रभात जयसूर्याने केवळ 2 रन्स केल्या. पासिनदू सूर्यबंदराने एका बाजूने लढत दिली. त्याने शानदार अर्धशतक करत 80 रन्सची खेळी केली. कामिंदू मेंडिसने 32 रन्सची खेळी केली. धनंजय डी सिल्वा कर्णधार म्हणून संघाला सावरण्यात अपयशी ठरला. तो केवळ 8 रन्स करून आउट झाला. श्रीलंकेचे अन्य फलंदाज सपशेल अपयशी ठरले.
भारतीय संघाची गोलंदाजी
भारतीय संघाने अत्यंत अचूक आणि भेदक अशी गोलंदाजी केल्याचे या सामन्यात दिसून आले. मोहम्मद सिराजने एक विकेट घेतली. प्रसिद्ध कृष्णाने महत्वाच्या 3 विकेट्स पटकावल्या. मानव सुथारने 2 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जाडेजाने 1 विकेट घेतली. भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत श्रीलंकन संघ कठीण परिस्थितीत असल्याचे दिसून येत होते. दुसऱ्या दिवशी त्यांनी केवळ आठ धावांत दोन विकेट गमावल्या. जर श्रीलंकेला या सामन्यात फॉलो-ऑन टाळण्यासाठी तर त्यांना किमान ३०३ धावा कराव्या लागणार आहेत.
Ravindra Jadeja strikes! 🙌 His first wicket of the match as Sri Lanka lose Pasindu Sooriyabandara 👍 Updates ▶️ https://t.co/r9FgXSdsMf#TeamIndia | #SLvIND | @imjadeja pic.twitter.com/mVR2CIeHF0 — BCCI (@BCCI) August 25, 2026
IND vs SL: रागात फेकले ग्लव्स, ड्रेसिंग रूममध्ये घातला गोंधळ! आऊट दिल्यावर अंपायरवर भडकला जयसूर्या