
IND VS SL PITCH REPORT
पहिला सामना भारताने १६५ रन्सने श्रीलंकेविरुद्ध जिंकला आहे. दुसरा सामना कोलंबोमध्ये होणार आहे. कोलंबोचे पीच कसे असणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. स्पिनर्ससाठी अनुकूल पीच तयार केले गेले तर ते श्रीलंकेच्या संघासाठी धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. गॉल टेस्ट प्रमाणे या ठिकाणचे पीच देखील संतुलित तयार केले जाण्याची शक्यता आहे.
श्रीलंकेचे अनेक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याने अनेक युवा खेळाडू खेळताना दिसणार आहेत. संतुलित पीच वर खेळण्यास नव्या खेळाडूना एक चांगले अनुभव देणारे असू शकते. ज्यामुळे श्रीलंकेजवळ सामना जिंकण्याची किंवा अनिर्णित करण्याची संधी असू शकते. मात्र टीम मॅनेजमेंट कोणत्या प्रकारचे पीच ठेवणार हे २३ तारखेलाच दिसून येणार आहे.
श्रीलंकेच्या संघाकडे स्पिनर्स असून देखील त्यांना भारताला अडचणीत आणता आले नाही. भारतीय फलंदाजांनी श्रीलंकेसमोर चांगली फलंदाजी केली. मात्र भारतीय स्पिनर्ससमोर श्रीलंकेने गुडघे टेकले. रवींद्र जाडेजा, मानव सुथार यांच्यासमोर श्रीलंकेने शरणागती पत्करली होती. मानव सुथारने पूर्ण सामन्यात १० तर रवींद्र जाडेजाने ४ विकेट्स घेतल्या होत्या.
पहिल्या सामन्यात भारताकडून देवदत्त पडीकलने शानदार फलंदाजी केल्याचे दिसून आले. देवदत्तने पहिल्या डावात १६७ रन्सची शानदार खेळी केली. तर दुसऱ्या डावात ४४ रन्सची खेळी केली. केएल राहुल आणि ध्रुव जुरेलने देखील आक्रमक फलंदाजी करत भारताला विजयाच्या दिशेने नेले. तर स्पिनर्सने शेवच्या दिवशी कमाल गोलंदाजी करत भारताला विजय प्राप्त करून दिला. त्यामुळे दुसरा सामना देखील भारताने जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारतासाठी ही सिरिज अत्यंत महत्वाची असणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारताला ८ पैकी किमान ६ सामने जिंकणे आवश्यक असणार आहे.