Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs AUS Semi Final: अखेर 2023 चा वचपा काढलाच; ‘कांगारूं’ना नमवत भारताची फायनलमध्ये शानदार धडक

Champions Trophy 2025: भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. विराट कोहलीने केलेली 84 धावांची खेळी महत्वाची ठरली.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 04, 2025 | 09:56 PM
IND Vs AUS Semi Final: अखेर 2023 चा वचपा काढलाच; ‘कांगारूं’ना नमवत भारताची फायनलमध्ये शानदार धडक
Follow Us
Close
Follow Us:

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सेमीफायनलचा सामना पार पडला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय प्राप्त केला आहे. ऑस्ट्रेलियाला नमवत भारताने फायनलमध्ये धडक मारली आहे. भारताने ऑस्ट्रेलियावर 5 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. विराट कोहलीने केलेली 84 धावांची खेळी महत्वाची ठरली. ऑस्ट्रेलियाने भारताला 265 धावांचे लक्ष्य दिले होते.

CT 2025. India Won by 4 Wicket(s) (Qualified) https://t.co/HYAJl7biEo #INDvAUS #ChampionsTrophy #SemiFinals — BCCI (@BCCI) March 4, 2025

 

भारताने 265 धावांचे लक्ष्य हे 6 विकेट्स गमावत 48 व्या ओव्हरमध्ये पूर्ण केले. के. एल. राहुलने विजयी षटकार मारत भारताच्या विज्यावर शिक्कामोर्तब केले. श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने केलेली भागीदारी या विजयात मोलाची ठरली. त्यानंतर विराटने अक्षर पटेल, के. एल. राहुलबरोबर केलेल्या लहान लहान पार्टनरशिप देखील महत्वाच्या ठरल्या. आजचा सामना जिंकून भारताने 2023 मधील फेणलचा वचपा देखील काढला आहे.

स्टीव्ह स्मिथ आऊट होताच गौतम गंभीरचा जल्लोष

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथला चांगली लय सापडली होती. त्याने सामन्यादरम्यान अनेक आकर्षक शॉट्स खेळले. आणखी थोडावेळ त्याने मैदानावर घालवला असता तर कांगारूंनी ३०० चा आकडा पार केला असता. मात्र ३७ व्या षटकात शमीचा एकच्या एका चेंडूवर तो बाद झाला. यावेळी भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरचा उत्साह पाहण्यासारखा होता.

Gautam Gambhir after Steve Smith Wicket 🤣#INDvsAUS pic.twitter.com/NGWdTRxkQx — Vikas Yadav (@VikasYadav66200) March 4, 2025

स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर, ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित असलेले भारतीय खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफ खूप आनंदी दिसत होते. संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर वेगळ्याच मूडमध्ये दिसला. त्याने गर्जना करून आपला आनंद व्यक्त केला. यावेळी तो काहीतरी बडबडतानाही दिसला. पण तो काय म्हणाला? याची पुष्टी होऊ शकली नाही.

मोहम्मद शमीचा प्रभावी मारा

स्टीव्हन स्मिथने 96 चेंडूमध्ये 73 धावा केल्या तर अ‍ॅलेक्स केरीने 57 चेंडूमध्ये 61 धावा करत ऑस्ट्रेलियाला 264 धावापर्यंत पोहचवले. ऑस्ट्रेलियाने सर्वबाद 264 धावापर्यंत मजल मारली आहे.  भारताकडून मोहम्मद शमीने 3 विकेट्स तर रवींद्र जडेजा आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.

सेमीफायनल १ मधील दोन्ही संघाची प्लेइंग ११

चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये भारतीय संघाची प्लेइंग ११

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली , श्रेयस अय्यर , अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शामी आणि वरुण चक्रवर्ती

चॅम्पियन ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११

ट्रॅव्हिस हेड, कूपर क्रोनाली, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिश (विकेटकिपर), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशियस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, तनवीर संघा

Web Title: India won semi final against australia and enter final at champions trophy 2025 sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 09:34 PM

Topics:  

  • Champions Trophy 2025
  • IND VS AUS
  • Team India
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
1

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल
2

IND vs SA 2nd Test : दुसऱ्या कसोटीतून शुभमन गिल बाहेर, कोण घेणार जागा? हे 3 खेळाडू दावेदार; भारताच्या प्लेइंग 11 मध्ये होणार बदल

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा
3

भारताने फिरकीसाठी बनवली खेळपट्टी, पण ‘या’ कारणामुळे डाव आला अंगाशी! ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूचा खुलासा

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
4

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.