Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shreyas Iyer चा ‘वन-मॅन शो’ ! शतक ठोकलं अन् ‘किंग’ कोहलीचा विक्रम मोडला; वेस्ट इंडिजविरुद्ध रचला इतिहास

Shreyas iyer broke Virat Kohlis T20 Captaincy Record: श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात शानदार शतक झळकावले. यासह, त्याने विराट कोहलीचा एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 07, 2026 | 05:07 PM
Shreyas Iyer

Shreyas Iyer

Follow Us
Follow Us:
  • वेस्ट इंडिजला झोडपलं
  • कोहलीचा विक्रम मोडला
  • अय्यरचा ‘डबल धमाका’
Shreyas Iyer: भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध यांच्यात पाच सामन्यांच्या टी-२० मालिका सुरु आहे. मालिकेतील पहिला सामनाव६ ऑक्टोबर रोजी खेळण्यात आला. हा सामना लखनौ येथील एकाना स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरने शानदार कामगिरी केली. त्याने एक शानदार शतक झळकावले आणि भारताला आठ विकेट्सने जिंकण्यास मदत केली. श्रेयस अय्यरने आपल्या स्फोटक खेळीने वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना पूर्णपणे उद्ध्वस्त केले. यासह, त्याने विराट कोहलीचा विक्रम मोडला आहे. तसेच, ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे.

Ajit Agarkar चा कार्यकाळ संपताच गौतम गंभीर भावूक; सोशल मीडियावर शेअर केली खास पोस्ट, म्हणाला…

विराट कोहलीला टाकले मागे

अय्यरने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आपले पहिले शतक झळकावले असून, या फॉरमॅटमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना शतक करणारा तो पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. यापूर्वी, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीच्या नावावर सर्वोच्च खेळीचा रेकॉर्ड होता . त्याने २०१९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ५० चेंडूंमध्ये ९४ धावा केल्या होत्या. मात्र, आता अय्यरने किंग कोहलीला मागे टाकले आहे. याव्यतिरिक्त, श्रेयस अय्यर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारा तिसरा भारतीय कर्णधार ठरला. यापूर्वी रोहित शर्माने कर्णधार म्हणून तीन शतके झळकावली होती. इतकेच नव्हे, तर सूर्यकुमार यादवने डिसेंबर २०२३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कर्णधार म्हणून शतक झळकावले होते.

श्रेयस अय्यरची शानदार खेळी

श्रेयस अय्यरने वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार शतक झळकावले. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा स्वस्तात बाद झाले असताना अय्यरने ही प्रभावी कामगिरी केली. अशा परिस्थितीतही अय्यर खेळपट्टीवर टिकून राहिला आणि मोठे शॉट्स खेळणे सुरू ठेवले. त्याने ४३ चेंडूंमध्ये नाबाद १०२ धावा केल्या. आपल्या खेळीत त्याने १० चौकार आणि ६ षटकार मारले.

प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने १९.१ षटकांत १७१ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून शाई होपने ३७ चेंडूंमध्ये ५२ धावांची शानदार खेळी केली. शेफ्रान रदरफोर्डनेही ३४ चेंडूंमध्ये ५६ धावा केल्या. भारतासाठी नमन धीरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतले. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतले. अय्यरच्या शतकाच्या आणि ईशान किशनच्या २७ चेंडूंतील ३७ धावांच्या जोरावर भारताने १४.४ षटकांत लक्ष्य गाठले. टीम इंडियाने हा सामना ८ विकेट्सने जिंकला.

Virat Kohli: प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी घेतले 5 कोटी? आरोपांनंतर विराट कोहलीच्या टीमचं सडेतोड उत्तर; मीडियालाही सुनावलं

Web Title: Shreyas iyer breaks virat kohli t20 captaincy record west indies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 05:07 PM

Topics:  

  • Ind vs WI
  • Shreyas Iyer
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?
1

IND VS WI: आग ओकायला Team India चे बॅटसमन तयार; इंडिजविरुद्ध कुठे होणार दुसरा T20 सामना?

Virat Kohli: प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी घेतले 5 कोटी? आरोपांनंतर विराट कोहलीच्या टीमचं सडेतोड उत्तर; मीडियालाही सुनावलं
2

Virat Kohli: प्रेमानंद महाराजांना भेटण्यासाठी घेतले 5 कोटी? आरोपांनंतर विराट कोहलीच्या टीमचं सडेतोड उत्तर; मीडियालाही सुनावलं

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय
3

Shreyas Iyer: श्रेयस अय्यरच्या शतकीय खेळीने झाले अनेक रेकॉर्ड, आकड्यात जाणून घ्या भारताचा ऐतिहासिक विजय

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..!  कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव
4

IND Vs WI : तोच फॉर्म, तोच अंदाज..! कर्णधार अय्यरला भारताच्या विजयाचे ‘श्रेय’श, विडिंजचा पराभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.