Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs ENG 1st ODI: भारताचा इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय; शुभमन-श्रेयसच्या जोडीची कमाल, ‘हीटमॅन’ फेल

Nagpur News: इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  फलंदाजी करून इंग्लंडने भारताला 249 धावांचे लक्ष्य दिले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 06, 2025 | 08:54 PM
IND vs ENG 1st ODI: भारताचा इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय; शुभमन-श्रेयसच्या जोडीची कमाल, 'हीटमॅन' फेल

IND vs ENG 1st ODI: भारताचा इंग्लंडविरुद्ध दणदणीत विजय; शुभमन-श्रेयसच्या जोडीची कमाल, 'हीटमॅन' फेल

Follow Us
Close
Follow Us:

INDIA Vs ENGLAND: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये पहिला एकदिवसीय सामना पार पडला. पहिला सामना हा नागपूरमध्ये खेळला गेला. या सामन्यात भारताने इंग्लंडवर 4 विकेट्सने विजय मिळवला आहे. इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  फलंदाजी करून इंग्लंडने भारताला 249 धावांचे लक्ष्य दिले होते. भारताने हे लक्ष्य 6 विकेट गमावून केवळ 39 ओव्हर्समध्येच पूर्ण केले.

भारताची फलंदाजी सुरू झाली आणि रोहित शर्मा लगेचच बाद झाला. या सामन्यात त्याला सूर गवसतो का याकडे सर्वांचे लक्ष होते. मात्र टो केवळ 2 धावा करून बाद झाला. तर सलामीवर यशस्वी जयस्वाल देखील लगेच बाद झाला. एकामागोमाग 2 विकेट गेल्याने भारताचा संघ दडपणाखाली आला. मात्र त्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यरने भारताचा डाव पुढे नेला. तर दुसऱ्या बाजूला शुभमन गिलने देखील बाजू सावरून धरली होती.

श्रेयस अय्यरने 30 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 36 चेंडूत 59 धावा केल्या. भारताची धावसंख्या 113 असताना अय्यर बाद झाला. मात्र संघाने अक्षर पटेलला वर खेळण्यास पाठवले. त्या संधीचे सोने अक्षरने केले. अक्षर पटेलने 47 चेंडूत 52 धावा करून भारताला सावरले. त्यानंतर मैदानात खेळायला आलेला केएल राहुल खास खेळी करू शकला नाही. शुभमन गिलने तडाखेबंद खेळी केली. शुभमन गिलने 96 चेंडूत 87 धावा केल्या. हार्दिक पंड्याने दुसऱ्याच चेंडूवर षटकार ठोकला.

1ST ODI. India Won by 4 Wicket(s) https://t.co/B13UlBNLvn #INDvENG @IDFCFIRSTBank

— BCCI (@BCCI) February 6, 2025

इंग्लंडने प्रथम फलंदाजी केली. दुखापत झाल्याने या सामन्यात विराट कोहली खेळत नाहीये. इंग्लंडकडून फिलिप सॉट आणि बेन डकेट यांनी 75 धावांची चांगली भागीदारी करून दिली. पहिलाच सामना खेळत असलेला हर्षित राणाने आज कमाल गोलंदाजी करत 3 विकेट्स घेतल्या. हर्षित राणाने 7 ओव्हर्स टाकल्या. त्यातील एक ओव्हर त्याने मेडन टाकली. 53 धावा देत त्याने 3 बळी टिपले.

फिरकीपटू रवींद्र जाडेजाने देखील जबरदस्त गोलंदाजी करत इंग्लंडच्या फलंदाजांना जास्त धावा करू दिल्या नाहीत. मोहम्मद शमी, अक्षर पटेल यांनी देखील चांगली गोलंदाजी केली.

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी भारताची प्लेइंग ११ :

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, के. एल. राहुल (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, हर्षित राणा, कुलदीप यादव.

पहिल्या एकदिवसीय सामन्यासाठी इंग्लंडची प्लेइंग ११ :

फिल्ल सॉल्ट (विकेटकीपर), बेन डकेट, जो रूट, जोस बटलर (कर्णधार), जेकब बेथेल, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, ब्रायडॉन कार्स, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, साकिब महमूद

 

Web Title: India won the 1st odi 4 wickets against england nagpur latest sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 06, 2025 | 08:34 PM

Topics:  

  • India vs England
  • Nagpur
  • Rohit Sharma
  • Team India

संबंधित बातम्या

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल
1

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ
2

Asia Cup 2025: पाकिस्तानलाच नव्हे, तर ‘या’ संघांनाही Team India देणार कडवी झुंज! लगेच नोंदवा तारीख आणि वेळ

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
3

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 
4

Asia cup 2025 : निवडकर्त्यांवर वाढतोय रोष! ‘हिटमॅन’  शर्माच्या मित्राची श्रेयस अय्यरच्या बाजूने मैदानात उडी.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.