फोटो सौजन्य - Chess Base India सोशल मीडिया
चेस ऑलिम्पियाड २०२४ : बुडापेस्टमध्ये होणाऱ्या चेस ऑलिम्पियाड २०२४ सुरु आहे, आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे. यामध्ये भारताचा महिला आणि पुरुष संघ दमदार कामगिरी करत आहेत. भारताच्या पुरुष संघाने दमदार कामगिरी करत एकही सामना न गमावता पहिल्या स्थानावर विराजमान आहे. काल भारतीय पुरुष संघाचा सामना यूएसए विरुद्ध झाला, यामध्ये टीम इंडियाने २.५-१.५ अशी ही आणखी एक शानदार खेळी होती. डी. गुकेशने फॅबियन कारुआनाचा पराभव केला आणि भारतीय खेळाडूने ९७.४ टक्के अचूकतेने सामना पूर्ण केला. दुसऱ्या बोर्डमध्ये, प्रग्नानंधाला वेस्ली सो विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला, परंतु अर्जुन एरिगासीने लीनियर डोमिंग्वेझवर विजय मिळवून जोरदार पुनरागमन केले. अंतिम सामन्यात विदित गुजराथी याने लेव्हॉन अरोनियन विरुद्ध गोल करत भारताचा विजय निश्चित केला.
भारतीय महिला संघाबद्दल बोलायचं झालं तर महिला संघाला एक सामना यूएसए विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. या पराभवानंतरही भारताच्या सांग गुणतालिकेमध्ये पहिल्या स्थानावर आहे. आजच्या सामन्यांमध्ये भारतीय महिला संघाने सामना नावावर केल्यावर संघ गोल्ड मेडल नावावर करेल. पुरुष संघ १९/२० गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे. तर महिला संघ १७/२० गुणांसह प्रथम क्रमांकावर आहे. महिला संघासाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळे हा सामना त्यांना जिंकणे अनिवार्य आहे.
भारताचा पुरुष संघ स्लोव्हेनियाविरुद्ध होणार आहे, स्लोव्हेनियाचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यामुळे भारतासाठी आव्हान उभे करू शकतात. तर महिला चेस संघाचा सामना अझरबैजानविरुद्ध होणार आहे. आज चेस ऑलिम्पियाड २०२४ चा शेवटचा म्हणजेच ११ वा राउंड आहे. अझरबैजानचा संघ गुणतालिकेमध्ये नवव्या स्थानावर आहे.