Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shocking: भारतीय क्रिकेटरला मोठा धक्का! PBKS मधील स्टार खेळाडूविरूद्ध FIR दाखल, Cook ला मारहाणीचा आरोप

पोलिसांनी एका भारतीय क्रिकेटपटू आणि पंजाब किंग्सच्या खेळाडूविरोधात FIR दाखल केले आहे. स्वयंपाक्याला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 30, 2026 | 03:02 PM
क्रिकेटर शशांक सिंहवर मारहाणीचा आरोप (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/X.com)

क्रिकेटर शशांक सिंहवर मारहाणीचा आरोप (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम/X.com)

Follow Us
Follow Us:
  • पंजाब किंंग्जच्या उपकप्तानवर लागला मोठा आरोप
  • मारहाणीचा आरोपाखाली एफआयआर दाखल
  • भारतीय क्रिकेटरने अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही 
भारतीय क्रिकेटसाठी हा एक मोठा धक्का ठरू शकतो. IPL संपल्यानंतर, पोलिसांनी भारतीय क्रिकेटपटू आणि पंजाब किंग्सचा खेळाडू शशांक सिंगविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. शशांकने स्वयंपाकी कर्मचारी विपेंद्र सिंग याला मारहाण करून त्याचा छळ केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. मारहाणीसह अनेक आरोपांखाली तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये, IPL खेळाडू शशांक सिंग, त्याचे वडील, निवृत्त आयपीएस अधिकारी शैलेश सिंग आणि कुटुंबाच्या ड्रायव्हरविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करणाऱ्या विपेंद्र सिंग तोमर (३१) यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेवा येथील रहिवासी असलेल्या विपेंद्रने आरोप केला आहे की, त्याला मारहाण करण्यात आली, त्याचा छळ करण्यात आला आणि त्याला जबरदस्तीने डांबून ठेवण्यात आले. या तक्रारीच्या आधारे सोमवारी रतिबाद पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सरकारी नोकरीचे आश्वासन

स्वयंपाकी विपेंद्र सिंग यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, त्यांना एका ओळखीच्या व्यक्तीमार्फत रेवा येथून भोपाळला आणण्यात आले. त्यांनी दावा केला की, त्यांना माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या नीलबाद येथील बंगल्यात दरमहा १५,००० रुपये पगाराची नोकरी, मोफत निवास आणि भोजन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, तसेच भविष्यात सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत करण्याचेही आश्वासन दिले होते.

IND vs ENG: Vaibhav Sooryavanshi इन आणि संजू आऊट? इंग्लंडविरूद्ध पहिल्या T20 साठी संभाव्य Playing XI

मानसिक छळाचे आरोप

तक्रारदाराचा आरोप आहे की, काम सुरू केल्याच्या काही तासांतच त्यांचा मानसिक छळ आणि अपमान करण्यात आला. जेवणाच्या दर्जाबद्दल तक्रार केल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली, असा त्यांचा दावा आहे.

याशिवाय नोकरी सोडण्याच्या धमकीनंतर फोन जप्त करण्यात आल्याचेही सांगितलं. तक्रारदाराने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जेव्हा त्यांनी अपमानास्पद वातावरण पाहिले आणि नोकरी सोडून घरी परतण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा शशांक संतापला. स्वयंपाक्याने पुढे आरोप केला की, आरोपीने त्यांना कोणाशीही संपर्क साधता येऊ नये म्हणून त्यांचा मोबाईल फोन जबरदस्तीने जप्त केला आणि त्यांच्या इच्छेविरुद्ध काम सुरू ठेवण्यासाठी दबाव टाकला.

जबरदस्तीने दरवाजा उघडून मारहाण

तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, त्याने स्वतःच्या संरक्षणासाठी स्वतःला एका खोलीत कोंडून घेतले होते. मात्र, वडील-मुलगा जोडीने त्यांच्या ड्रायव्हरसह कथितरित्या दरवाजा उघडून त्याच्यावर निर्घृणपणे हल्ला केला. पोलिसांनी केलेल्या वैद्यकीय तपासणीत पीडिताच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर जखमांच्या स्पष्ट खुणा आढळून आल्या.

IND vs ENG: नव्याने सुरूवात! आता इंग्लंडला भिडणार Team India, पूर्ण शेड्युलची लिस्ट

या कलमांखाली गुन्हा दाखल

An FIR has been registered against Indian Cricketer and Punjab Kings Player Shashank Singh for allegedly assaulting and verbally abusing a staff member responsible for cooking, Vipendra Singh. A case has been registered against 3 individuals on charges including assault — ANI (@ANI) June 30, 2026

औपचारिक तक्रार आणि वैद्यकीय अहवालांच्या आधारे, रतनगड पोलिसांनी प्रथम माहिती अहवाल (FIR) नोंदवला आहे. भारतीय दंड संहितेच्या (IPC) संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे: कलम २९६ (ब) अश्लील कृत्य आणि सार्वजनिक अश्लीलता; कलम ११५ (२) स्वेच्छेने दुखापत/हल्ला करणे; आणि कलम ३ (५) संयुक्त फौजदारी जबाबदारी (एकापेक्षा जास्त व्यक्तींनी समान उद्देशाने केलेली कृत्ये).

दरम्यान FIR बाबत क्रिकेटपटूकडून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. तसंच बीसीसीआय किंवा पंजाब किंग्सकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

Web Title: Indian cricketer who plays for punjab kings shashank singh faces allegations of assault fir registered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • cricket news
  • FIR
  • Shashank Singh

संबंधित बातम्या

AUS Vs BAN:  ऑस्ट्रेलियाची इज्जत जाणार? डार्विनमध्ये बांगलादेशकडे ‘हा’ रेकॉर्ड रचण्याची संधी…
1

AUS Vs BAN: ऑस्ट्रेलियाची इज्जत जाणार? डार्विनमध्ये बांगलादेशकडे ‘हा’ रेकॉर्ड रचण्याची संधी…

क्रिकेटर Abishek Porel च्या अडचणीत वाढ! रेप प्रकरणात कोर्टाने जामीन फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश
2

क्रिकेटर Abishek Porel च्या अडचणीत वाढ! रेप प्रकरणात कोर्टाने जामीन फेटाळला; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडीचे आदेश

Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट
3

Cricket News: आकाशदीप-मुकेश कुमार यांची DSPची खुर्ची धोक्यात? बिहार सरकारने ठेवली ‘ही’ मोठी अट

AUS vs BAN: हसन महमूदने ऑस्ट्रेलियाचा पाडला फडशा, 6 विकेट्स घेत 198 धावात केले गारद
4

AUS vs BAN: हसन महमूदने ऑस्ट्रेलियाचा पाडला फडशा, 6 विकेट्स घेत 198 धावात केले गारद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.