भारतीय फुटबॉल संघ(फोटो-सोशल मीडिया)
Indian football team announcement : भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यता आली आहे. नवे मुख्य प्रशिक्षक खालिद जमील यांनी सोमवारी २९ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या सीएएफए नेशन्स कपसाठी २३ सदस्यीय भारतीय संघ जाही केला आहे. जमील यांच्या मार्गदर्शनाखाली ही राष्ट्रीय संघाची पहिली स्पर्धा असणार आहे. भारतीय संघ स्पर्धेत भाग घेण्यासाठी ताजिकिस्तानला जाईल जिथे त्याला यजमान, गतविजेत्या इराण आणि अफगाणिस्तानसह गट ब मध्ये स्थान देण्यात आले आहे.
भारत २९ ऑगस्ट रोजी यजमान ताजिकिस्तानशी सामना करेल तर इराण १ सप्टेंबर रोजी आणि अफगाणिस्तान ४ सप्टेंबर रोजी खेळेल. मोहन बागानच्या खेळाडूंचा जमीलने २९ खेळाडूंच्या उपस्थितीत झालेल्या शिबिरानंतर अंतिम संघाची घोषणा केली आहे.
मोहन बागानचे लिस्टन कोलाको, मनवीर सिंग आणि सुभाषिश बोस हे देखील संघाचा भाग नाहीत. कारण त्यांच्या क्लबने त्यांना राष्ट्रीय शिबिरात पाठवण्यास नकार दिला आहे. स्पर्धेच्या स्वरूपानुसार, प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ ८ सप्टेंबर रोजी होणाऱ्या प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील. गट उपविजेते दुशान्बे येथे तिसऱ्या स्थानासाठी सामना खेळतील तर गट विजेत्यांमध्ये अंतिम सामना ताश्कंद येथे होईल. जमशेदपूर एफसीचे मुख्य प्रशिक्षक म्हणून प्रभाव पाडणाऱ्या जमीलला एएफसी आशियाई कप पात्रता फेरीत संघर्ष करणाऱ्या भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढवावा लागेल. सुरुवातीच्या दोन सामन्यांनंतर त्यांच्याकडे फक्त एक गुण आहे आणि ते शेवटच्या स्थानावर आहेत.
गोलकीपरः गुरप्रीत सिंग संधू, अमरिंदर सिंग, हृतिक तिवारी.
डिफेंडर: राहुल भेके, नौरेम रोशन ि संदेश झिंगन, विंगलेनसाना सिंग, हिंगथनमाविया राल्टे, मोहम्मद उवाई.
मिडफील्डरः निखिल प्रभू, सुरेश सिंग वांगजाम, दानिश फारूख भट, जेक्सन सिंग, बोरिस सिंग, आशिक कुरुनियान, उदांता सिंग, नौरेम महेश सिंग.
फॉरवर्डः इरफान यादव, मनवीर सिंग (ज्युनियर), जितिन एमएस, ललियानझुआला छांगटे, विक्रम प्रताप सिंग.
हेही वाचा : टॉप टेन टी-२० गोलंदाजांच्या यादीत भारताचे नाव नाहीच..! आकडेवारीने स्पष्ट केले ‘हे’ कारण
आशिया कप 2025 स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरवात होणार आहे. ही स्पर्धा यावेळी टी 20 स्वरूपात खेळवली जाणार आहे. भारत 10 सप्टेंबरला युएइविरुद्ध पहिला सामना खेळून आपल्या मोहिमेला सुरवात करणार आहे. त्यानंतर 14 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत. याबाबत आता माजी क्रिकेटपटू मनोज तिवारीने भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरवर निशाणा साधला आहे. तिवारीने म्हटले आहे की, गौतम गंभीर जेव्हा भारतीय संघाचा प्रशिक्षक नव्हता तेव्हा त्याचे भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याबाबत फार वेगळी मतं असायची. मात्र आता मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर गंभीर मूग गिळून गप्प बसला आहे, असं माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी गंभीरवर निशाणा साधत म्हटले आहे. भारत पाकिस्तान यांच्यात सामना होणार असल्याने मनोज तिवारीने संताप व्यक्त केला आहे.