फोटो सौजन्य - हॉकी इंडिया सोशल मिडीया
भारत विरुद्ध पाकिस्तान हॉकी सामना : सध्या चीनमध्ये सुरु असलेल्या हॉकी आशिया चॅम्पियनशिप २०२४ मध्ये भारताचा संघ दमदार फॉर्ममध्ये दिसत आहे. भारताच्या संघाने आतापर्यत एकही सामान ग गमावता सेमीफायनलचा मार्ग मोकळा करण्याच्या इराद्यानेचं संघ मैदानात उतरला आहे. भारताचा हॉकी संघाने हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली संघाने कांस्यपदक मिळवले. आता भारताचा संघ पुन्हा ही स्पर्धा हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वात दमदार कामगिरी करताना दिसत आहे.
भारताच्या हॉकी संघाचा पहिला सामना चीनविरुद्ध पार पडला. यामध्ये भारताच्या संघाने दमदार कामगिरी करत ३-० ने सामना जिंकला. त्यानंतर जपानच्या संघाला भारताच्या हॉकी संघाने ५-१ ने पराभूत केले आणि दुसरा विजय नावावर केला. साखळी सामन्याचा तिसरा सामना कोरिया विरुद्ध झाला या सामन्यामध्ये भारताच्या संघाने ३-१ ने कोरियाला पराभूत केलं. भारताचा पुढील सामना महत्वाचा सामना असणार आहे. शेवटच्या चकमकीत भारताने चेन्नईमध्ये पाकिस्तानचा 3-1 असा पराभव करून चौथ्या विजेतेपदाचा मार्ग मोकळा केला होता. IND vs PAK आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सामना हा दोन हॉकी दिग्गजांमधील ॲक्शन-पॅक स्पर्धा असेल अशी अपेक्षा आहे.
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही हॉकी संघ २५ वेळा आमनेसामने आले आहेत. तर पाकिस्तान हॉकी संघाने ५ सामने जिंकले आहेत. यामध्ये चार सामने अनिर्णयीत राहिले आहेत.
भारताचा पुढील सामना पाकिस्तान विरुद्ध आयोजित करण्यात आला आहे. हा सामना १४ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना १.१५ pm थेट प्रक्षेपण होणार आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सामना चीनमधील हुलुनबुर येथे होणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी सामन्याचे थेट प्रवाह SonyLiv ॲप आणि वेबसाइटवर पाहता येणार आहे. त्याचबरोबर या सामन्याचे टेलिव्हिजवर थेट प्रक्षेपण सोनी स्पोर्ट्स टेन 1 आणि टेन 1 एचडी चॅनेलवर उपलब्ध असेल.