महिला आशिया चषक 2022 (Womens Asia Cup)च्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेच्या महिला संघाचा धुव्वा उडवत आशिया चषकाच्या ट्रॉफीवर नाव कोरल आहे. भारतीय महिला संघाने आतापर्यंत तब्बल सात वेळा आशिया चषक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
यंदाची आशिया कप स्पर्धा बांग्लादेशच्या धर्तीवर खेळवण्यात आली असून तेथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगला होता.
प्रथम नाणेफेक जिंकत श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र भारतीय संघाच्या गोलंदाजांसमोर श्रीलंकेच्या फलंदाजानाचा निभाव लागला नाही. अवघ्या 65 धावात श्रीलंकेच्या संपूर्ण संघाला ऑल आउट करण्यात भारतीय महिला संघाला यश आले. भारतीय संघासमोर विजयासाठी 66 धावांचे आव्हान होते. भारतीय फलंदाज स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना 8.3 षटकातच जिंकला.
????. ?. ???! ? ? Clinical performance from #TeamIndia as they beat Sri Lanka to win the #AsiaCup2022 title! ? ? #INDvSL Scorecard ▶️ https://t.co/r5q0NTVLQC ? Courtesy: Asian Cricket Council pic.twitter.com/C61b4s1Hc2 — BCCI Women (@BCCIWomen) October 15, 2022
या विजयासह भारतानं सातव्यांदा महिला आशिया चषकावर नाव कोरलंय. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंकेच्या संघानं भारतीय गोलंदाज रेणुका सिंह (Renuka Singh), राजेश्वरी गायकवाड (Rajeshwari Gayakwad) आणि स्नेह राणाच्या (Sneh Rana) भेदक माऱ्यासमोर गुडघे टेकले. श्रीलंकेनं 20 षटकात 9 विकेट्स गमावून भारतानंसमोर 66 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात स्मृती मानधनाच्या (Smriti Mandhana) अर्धशतकीय खेळीच्या जोरावर भारतानं हा सामना 8.3 षटकातच जिंकला. अंतिम सामन्यात भारतानं श्रीलंकेचा आठ विकेट्सनं धुव्वा उडवला. भारतीय महिला संघाच्या या कामगिरीमुळे त्यांच्यावर सर्वस्थरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.






