Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ T20 World Cup 2026 Final: न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग-११ निश्चित; पाहा कोणाला मिळाली संधी?

IND vs NZ: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) सेमीफायनलमध्ये ज्या ११ शिलेदारांसह इंग्लंडचा पराभव केला होता, त्याच खेळाडूंवर फायनलमध्येही विश्वास दाखवला जाण्याची चिन्हे आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 08, 2026 | 04:53 PM
न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग-११ निश्चित (Photo Credit- X)

न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग-११ निश्चित (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • न्यूझीलंडविरुद्धच्या महामुकाबल्यासाठी भारताची प्लेइंग-११ निश्चित
  • पाहा कोणाला मिळाली संधी?
  • भारतासमोर इतिहास रचण्याची सुवर्णसंधी
India national cricket team vs New Zealand cricket team: आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ चा आज अहमदाबादमध्ये होणारा अंतिम सामना ऐतिहासिक ठरणार आहे. जेतेपदाचे रक्षण करण्यासाठी मैदानात उतरणारा भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्धच्या (IND vs NZ) या खिताबी लढतीत कोणताही बदल न करता उतरण्याची शक्यता आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने (Team India) सेमीफायनलमध्ये ज्या ११ शिलेदारांसह इंग्लंडचा पराभव केला होता, त्याच खेळाडूंवर फायनलमध्येही विश्वास दाखवला जाण्याची चिन्हे आहेत.

वरुण आणि अभिषेकला पुन्हा संधी

अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघात दोन महत्त्वाचे बदल होतील, अशी चर्चा क्रीडा वर्तुळात रंगली होती. विशेषतः खराब फॉर्मशी झुंजणारा सलामीवीर अभिषेक शर्मा आणि महागडा ठरलेला फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांना डच्चू मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. वरुणच्या जागी अनुभवी कुलदीप यादवला संघात स्थान मिळावे, अशी मागणी चाहत्यांकडून होत होती.

🚨 BIGGEST UPDATE ON TEAM INDIA’S PLAYING 11 🚨 • No change in India’s playing 11 vs New Zealand of T20 World Cup final.[Devendra Pandey] pic.twitter.com/5icYZtewFr — Cricket Central (@CricketCentrl) March 8, 2026

मात्र, मिळालेल्या वृत्तानुसार, संघ व्यवस्थापन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव हे ‘विनिंग कॉम्बिनेशन’मध्ये बदल करण्यास उत्सुक नाहीत. सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळवण्यासाठी भारत आपल्या जुन्याच यशस्वी प्लेइंग-११ सह मैदानात उतरेल.

IND vs NZ T20 Final: बुमराह विरुद्ध ॲलन की सॅमसन विरुद्ध हेन्री? अंतिम सामन्यात ‘या’ खेळाडूंमध्ये रंगणार चुरस; निर्णायक ठरेल लढत

वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह, तरीही संघात स्थान?

वरुण चक्रवर्तीने या विश्वचषकात आतापर्यंत १३ बळी घेतले आहेत. मात्र, सुपर-८ फेरीत त्याची ज्या प्रकारे धुलाई झाली, त्यामुळे भारताची गोलंदाजी केवळ जसप्रीत बुमराहवर अवलंबून असल्याचे दिसून आले. ७ मार्च रोजी झालेल्या सराव सत्रात वरुण आणि कुलदीप या दोघांनीही गोलंदाजीचा सराव केला होता. वरुण सराव अर्धवट सोडून गेला होता, तर कुलदीपने बराच वेळ घाम गाळला होता. यावरून वरुणला बाहेर बसवले जाईल असे वाटत होते, परंतु अखेर व्यवस्थापनाने त्याच्या अनुभवावरच शिक्कामोर्तब केले आहे. दुसरीकडे, सलामीवीर अभिषेक शर्मा या स्पर्धेत तीन वेळा शून्यावर बाद झाला आहे. झिम्बाब्वेविरुद्धची ५५ धावांची खेळी वगळता त्याला मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. तरीही त्याच्या आक्रमक शैलीवर विश्वास ठेवून त्याला अंतिम सामन्यात खेळवले जाणार आहे.

भारतासमोर इतिहास रचण्याची सुवर्णसंधी

जर आज भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव केला, तर क्रिकेटच्या इतिहासात अनेक नवे विक्रम प्रस्थापित होतील:

  • १. घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत पहिला देश ठरेल.
  • २. सलग दोनदा जेतेपद राखण्याचा विक्रम भारताच्या नावे होईल.
  • ३. एकूण तीन वेळा टी-२० विश्वचषक जिंकणारा भारत जगातील एकमेव संघ बनेल.

टी-२० वर्ल्ड कप फायनलसाठी भारताची संभाव्य प्लेइंग-११:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंह.

India vs New Zealand Final: आता पुरे झाले… सुनील गावस्कर अभिषेक शर्मावर संतापले! म्हणाले – “त्याला अंतिम सामन्यातून…”

Web Title: Indias playing 11 confirmed for the epic clash against new zealand see who got a chance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • cricket news
  • IND vs NZ
  • T20 World Cup 2026
  • Team India

संबंधित बातम्या

सगळीकडे लाज घालवतात! Pakistan चा ‘तो’ खेळाडू नशेत खेळला? करियरचा होणार नाश..
1

सगळीकडे लाज घालवतात! Pakistan चा ‘तो’ खेळाडू नशेत खेळला? करियरचा होणार नाश..

LSG vs RR Head to Head: लखनौच्या इकाना मैदानावर आज ‘नवाब’ की ‘राॅयल’ कोण ठरणार वरचढ? पाहा ‘हेड टू हेड’ रेकाॅर्ड
2

LSG vs RR Head to Head: लखनौच्या इकाना मैदानावर आज ‘नवाब’ की ‘राॅयल’ कोण ठरणार वरचढ? पाहा ‘हेड टू हेड’ रेकाॅर्ड

GT vs MI: उपराजधानीचा हिरा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात! 22 वर्षीय Danish Malewar चं पदार्पण; पहिल्याच सामन्यात कशी राहिली कामगिरी?
3

GT vs MI: उपराजधानीचा हिरा मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात! 22 वर्षीय Danish Malewar चं पदार्पण; पहिल्याच सामन्यात कशी राहिली कामगिरी?

BAN Vs NZ: बांग्लादेशने ‘किवीं’ना नमवलं; न्यूझीलंडची 6 विकेट्सने उडवली दाणादाण
4

BAN Vs NZ: बांग्लादेशने ‘किवीं’ना नमवलं; न्यूझीलंडची 6 विकेट्सने उडवली दाणादाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.