IPL 2025: Dark clouds loom over Chennai Super Kings; 'This' star player is likely to be out of the entire tournament...
IPL 2025 : आयपीएल २०२५ चा महामुकाबला रविवारी (२३ मार्च) पार पडला. त्यामध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करण्यात यश आले होते. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मधील हा सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर चेपॉक येथे खेळवण्यात आला होता. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिला सामना गमावला आहे. यामध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने पहिले सामन्यामध्ये मुंबईला ४ विकेट्सने पराभूत केले. यामध्ये सलामीवीर फलंदाज रचिन रवींद्र आणि कॅप्टन ऋतुराज गायकवाड यांनी चांगली कामगिरी केली. परंतु, सीएसकेमधील एक स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.
मुंबईविरूद्धच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ‘दुसरा मलिंगा’ समजला जाणारा मथिशा पाथिराना खेळला नाही. तेव्हा हे कोणाला कळले नाही. याबाबत चाहत्यांमध्ये बरीच चर्चा झाली होती. खूप चर्चा झाली तरी देखील फ्रेंचाइजीकडून कोणतेही विधान जारी करण्यात आले नव्हते. दरम्यान, सीएसकेच्या सूत्राने सांगितले की, ‘पाथिराना दुखापतीमुळे मुंबईविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळला नव्हता.’
एका कार्यक्रमात झालेल्या चर्चेदरम्यान, माजी भारतीय सलामीवीर कृष्णाचारी श्रीकांतच्या संघाशी संबंधित असणाऱ्या एका सूत्राने सांगितले की, ‘पथिराना दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. तसेच सूत्राने दावा केलाअ आहे की, ‘पुन्हा त्याच्या ॲक्शनवर काम करताना पाथिराना जखमी झाला. मात्र, जोपर्यंत फ्रँचायझी या मुद्द्यावर काहीही बोलत नाही, तोपर्यंत पूर्ण आश्वासनाने काही सांगता येणार नाही.’ तथापि, हे चिन्हे फारसे चांगले नाही. असे झाल्यास चेन्नईचे मोठे नुकसान होण्याची भीत आहे. पाथिराना जर स्पर्धेबाहेर झाला तर सीएसकेची गोलंदाजी आक्रमण लक्षणीयरित्या कमकुवत होणार आहे.
मागील मोसमात पाथीराना चेन्नईकडून फक्त ६ सामने खेळला होता. पण सामन्यांच्या संख्येनुसार त्याची कामगिरी अतिशय उत्कृष्ट होती. पाथीरानाने गेल्या मोसमात ६ सामन्यात २२ षटकात १३ बळी घेतले होते. २८ धावांत चार बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.
आयपीएल 2025 चा महामुकाबला रविवारी (23 मार्च) खेळवण्यात आला होता. या सामन्यात त्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जला पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सला पराभूत करण्यात यश आले होते. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स मधील हा सामना चेन्नईच्या होम ग्राऊंडवर चेपॉक येथे खेळवण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या, प्रत्युत्तरात चेन्नई सुपर किंग्जने रचिन आणि ऋतुराज यांच्या अर्धशतकांच्या जोरावर ५ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. आयपीएल २०१२ मध्ये, मुंबई इंडियन्सने त्यांच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा ८ विकेट्सने पराभव केला, तेव्हापासून मुंबईला आयपीएलमध्ये त्यांचा पहिला सामना जिंकता आलेला नाही. रविवारी चेन्नई सुपर किंग्जने विजयाने सुरुवात केली.