IPL 2025: MS DHONI will create history for CSK; 'This' legendary player's position is in danger...
IPL 2025 : 22 मार्चपासून IPL 2025 चा थरार सुरू होणार आहे. 18 व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा खेळताना दिसणार आहे. या 43 वर्षीय दिग्गज क्रिकेटपटूला चेन्नई सुपर किंग्ज संघाने 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवले होते. आता धोनी 23 मार्च रोजी 10 महिन्यांनंतर पहिला स्पर्धात्मक सामना खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत धोनीला सीएसकेसाठी एक इतिहास रचण्याची संधी चालून आली आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना 23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध होणार आहे. या सामन्यासाठी धोनीने आपल्या जुन्याच शैलीत तयारी सुरू केली आहे. चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. सुपर किंग्जसाठी नव्या मोसमातील पहिल्या सामन्यात धोनीला खास कामगिरी करण्याची संधी आहे. धोनी पहिल्या सामन्यात 19 धावा करण्यात यशस्वी ठरला तर तो चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार आहे. सध्या हा विक्रम सीएसकेचा माजी खेळाडू सुरेश रैनाच्या नावावर आहे.
हेही वाचा : IPL 2025 :अंबाती रायुडूकडून CSK साठी प्लेइंग इलेव्हनची घोषणा; ‘या’ बड्या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता..
आयपीएलमध्ये 12 वर्षे चेन्नई संघासोबत खेळताना रैनाने 176 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 4687 धावा केल्या आहेत. तर धोनीच्या नावावर 234 आयपीएल सामन्यांमध्ये सीएसकेसाठी 4669 धावा आहेत. रैनाला मागे टाकण्यापासून तो केवळ 19 धावा दूर आहे.
धोनीने कर्णधार म्हणून सीएसकेला पाच आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहेत. धोनीने गेल्या वर्षी खेळल्या गेलेल्या 14 आयपीएल सामन्यांमध्ये 161 धावा केल्या होत्या. त्याने 11 डावात एकूण 73 चेंडूंचा सामना केला आणि 14 षटकार आणि 13 षटकार ठोकलेअ आहेत. सीएसकेसाठी रैनाचा धावांचा विक्रम मोडण्याबरोबरच धोनीला या हंगामात आयपीएल इतिहासातील पाचवा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनण्याचीही संधी असेल.
सीएसकेसोबत पाच वेळा आयपीएल जिंकणारा कर्णधार धोनी दोन वर्षे पुणे सुपरजायंट्सकडून खेळलाअ आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 264 सामने खेळले असून या सामन्यांमध्ये त्याच्या नावावर एकूण 5243 धावा जमा आहेत. जर त्याने आयपीएलच्या 18 व्या हंगामात किमान 286 धावा केल्या तर तो 205 सामन्यांमध्ये रैनाच्या 5528 धावांचा आकडा मागे टाकेल.
आयपीएल 2025 चा पहिला सामना 22 मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल 2025पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरु होणार आहे.