IPL 2025 : मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हार्दिक पंड्या पायउतार; 'हा' दिग्गज सांभाळणार धुरा, चाहते कोमात...(फोटो-सोशल मीडिया)
IPL 2025: इंडियन प्रीमियर लीग सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या संघाची कमान सांभाळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या ऐवजी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करताना दिसणार आहे.
सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा कर्णधारपद सांभाळणार असल्याची बातमी खरी आहे. मात्र, तो केवळ एका सामन्यासाठी संघाची धुरा सांभाळणार आहे, जो या हंगामातील मुंबईचा पहिला सामना असणार आहे. चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्यात सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करताना बघायला मिळेल. त्यानंतर हार्दिक पांड्या दुसऱ्या सामन्यापासून पुन्हा मुंबईची कमान सांभाळताना दिसेल.
हेही वाचा : IPL 2025 : ‘…म्हणूनच माझी बदनामी’; आयपीएलपूर्वीच श्रेयस अय्यरची खदखद बाहेर..
आता साहजिकच तुमच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला असेल की, हार्दिककडून एका सामन्याचे कर्णधारपद का काढून घेण्यात आले? तर त्या मागील कारण असे आहे की, त्याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे. स्लो ओव्हररेटमुळे त्याच्यावर ही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईचा कर्णधार पंड्या या मोसमातील पहिला सामना खेळणार नाही.
हार्दिक पांड्याने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे की, त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करणार आहे. माध्यमांसोबत बोलताना तो म्हणाला की, ‘सूर्यकुमार यादव टीम इंडियाचा कर्णधार आहे आणि आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचे कर्णधारही असतील.”
गेल्या वर्षी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून दूर करत हार्दिक पांड्याकडे संघाचे नेतृत्व दिले होते. यानंतर मुंबई इंडियन्स संघाला तसेच हार्दिक पांड्याला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले होते. 2024 च्या आयपीएल हंगामात मुंबईची कामगिरीही देखील खूप निराशाजनक खराब होती.
मुंबई इंडियन्सचा पहिला सामना चेन्नई विरुद्ध आहे. यानंतर संघ गुजरात टायटन्सविरुद्ध खेळणार आहे. हा सामना २९ मार्च रोजी होणार आहे. तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आहे.
🚨 SURYAKUMAR YADAV WILL LEAD MUMBAI INDIANS VS CSK. 🚨
– Hardik Pandya not available due to the slow overrate ban he got last season. pic.twitter.com/Er0OErg5Zl
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) March 19, 2025
आयपीएल २०२५ चा पहिला सामना २२ मार्च रोजी म्हणजेच शनिवारी खेळला जाणार आहे. हा सामना गतविजेत्या केकेआर आणि आरसीबी यांच्या संघात (केकेआर विरुद्ध आरसीबी आयपीएल २०२५ पहिला सामना) खेळला जाईल. पहिल्या सामन्याचे आयोजन कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर करण्यात आले आहे. हा सामना केकेआर विरुद्ध आरसीबी यांच्यात या दोन संघामध्ये खेळवला जाणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.