Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : आता Babar Azam ला विसरा,  Virat Kohli च ठरला ‘टी-20 किंग’, ‘या’ बाबतीत बनला जगातील नंबर-१ फलंदाज..  

इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये 18 व्या हंगामातील ४२ वा सामन्यात राजस्थान रॉयल्सला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून पराभव पत्करावा लागला. या सामन्यात विराट कोहलीने पाकिस्तानचा क्रिकेटपटू बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 25, 2025 | 09:30 AM
IPL 2025: Forget Babar Azam now, Virat Kohli has become the 'T20 King', the world's number-1 batsman in 'this' regard..

IPL 2025: Forget Babar Azam now, Virat Kohli has become the 'T20 King', the world's number-1 batsman in 'this' regard..

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये 18 व्या हंगामातील ४२ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने  राजस्थान रॉयल्सचा धावांनी पराभव केला. आरआरचा कर्णधार रायन परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर आरसीबीला प्रथम फलंदाजी करत विराट कोहलीने अर्धशतकाच्या जोरावर 205 धावांचा डोंगर  उभा केला. प्रतिउत्तरात आरआर 194 धावांपर्यंतच मजल मारू शकला. परिणामी आपल्या घरच्या मैदनावार आरसीबीने आरआरला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकाने महत्वाची भूमिका बजावली. या अर्धशतकासह त्याने बाबर आझमचा विक्रम मोडीत काढला आहे.

आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने सामन्यात वेगवान खेळी केली.  विराटने राजस्थान रॉयल्सच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या सामन्यात त्याने 42 चेंडूचा सामना करत  ७० धावांची खेळी केली. यामध्ये त्याने 8 चौकार आणि  2 षटकार लागवले आहेत.  या उत्कृष्ट खेळीसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा विक्रम रचला आहे.

हेही वाचा : IPL 2025 : ‘०, १५, २, २, DNB, २१, ६३, ३, ० = २७ कोटी, Rishabh Pant ची एक धाव संजीव गोयंकांना पडतेय 25.50 लाख रुपयांना..

कोहलीकडून  बाबर आझमचा हा विक्रम मोडीत

आयपीएलमध्ये राजस्थानविरुद्ध ७० धावांच्या खेळीनंतर विराट कोहलीने पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमचा विक्रम मोडला आहे. विराट कोहली आता प्रथम फलंदाजी करताना टी-२० मध्ये सर्वाधिक अर्धशतके ठोकणारा फलंदाज बनला आहे. यासह, विराट कोहलीने धावांचा पाठलाग करत असताना ६२ अर्धशतके झळकावली आहेत. यापूर्वी हा विक्रम पाकिस्तानी फलंदाज बाबर आझमच्या नावे नोंदवला गेला होता.  धावांचा पाठलाग करताना त्याने ६१ अर्धशतके झळकावली आहेत.

टी-२० मध्ये धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक अर्धशतके झळकावणारे खेळाडू..

  1. विराट कोहली- ६२
  2. बाबर आझम- ६१
  3. ख्रिस गेल- ५७
  4. डेव्हिड वॉर्नर- ५५
  5. जोस बटलर- ५२
  6. फाफ डू प्लेसिस- ५२

हेही वाचा : RCB vs RR : Yashasvi Jaiswal चा IPL मध्ये भीम पराक्रम, अनोखा विक्रम करणारा बनला जगातील एकमेव फलंदाज..

आरसीबीने मैदान राखले, आरआरचा केला पराभव..

काल म्हणजेच गुरुवार(24 एप्रिल) रोजी बंगळुरू आणि राजस्थान यांच्यामध्ये आयपीएलचा 42 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात आरसीबीने घरच्या मैदनावर आरआरचा दणदणीत पराभव केला. राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला तर आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहलीच्या अर्धशतकाच्या(42 चेंडू 70 धावा) जोरावर 205 धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात राजस्थान रॉयल्सचा संघ 194 धावाच करू शकला आणि त्यांना या सीझनमधील सातवा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर जवळजवळ राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सला बंगळुरूने 11 धावांनी पराभूत केले.

 

 

Web Title: Ipl 2025 virat kohli now breaks babar azams record becomes t 20 king

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Babar Azam
  • IPL 2025
  • RCB vs RR
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?
1

क्रिकेट विश्वाला धक्का! Rohit-Virat अचानक ICC ODI Rankings मधून बाहेर; नेमकं कारण काय?

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी
2

PCB चा मोठा निर्णय! अशिया कपनंतर बाबर-रिझवान यांना केंद्रीय करारामधूनही वगळले! १२ नवीन खेळाडूंना संधी

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम
3

RCB च्या खेळाडूंचा The Hundred मध्ये धुमाकूळ! १३ चेंडूत चोपल्या ५० धावा; १३६ वर्षांचा मोडला विक्रम

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील
4

Photo : 290 डावांनंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये शतकांचा राजा कोण? भारताचे तीन खेळाडू टाॅप 5 मध्ये सामील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.