Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR vs RR: रिंकू सिंहचा ‘करबो लडबो जितबो रे’, 6 सामन्यानंतर मिळवला पहिला विजय; राजस्थानवर 4 विकेट्सने मात

आयपीएल २०२६ मध्ये सहा सामन्यांनंतर कोलकाता नाइट रायडर्सने अखेर आपला पहिला विजय मिळवला. केकेआरने राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना चार गडी राखून जिंकला. रिंकू सिंहने मॅच खेचत मिळवून दिला पहिला विजय

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 19, 2026 | 07:46 PM
राजस्थान रॉयल्सकडून रिंकू सिंहने खेचून आणली मॅच (फोटो सौजन्य - Instagram)

राजस्थान रॉयल्सकडून रिंकू सिंहने खेचून आणली मॅच (फोटो सौजन्य - Instagram)

Follow Us
Close
Follow Us:
  • रिंकू सिंहने ओढून आणला पहिला विजय
  • राजस्थान रॉयल्सला दिली मात
  • पुन्हा एकदा हरण्याच्या स्थितीत असतानाही रिंकूने धैर्याने खेळ दाखवला 
आयपीएल २०२६ मध्ये, रविवारी १९ एप्रिल रोजी डबलहेडर म्हणून दोन सामने खेळले जात आहेत. पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला मात्र हाच निर्णय त्याच्यासाठी चुकीचा ठरला. जयस्वाल आणि वैभव सूर्यवंशी वगळता कोणीही चांगला खेळ दाखवला नाही आणि कोलकातासाठी केवळ १५५ धावांचे लक्ष्य राजस्थानला ठेवता आले. 

राजस्थानने २० षटकांत ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. राजस्थानकडून वैभव सूर्यवंशीने सर्वाधिक ४६ धावा केल्या, तर यशस्वी जैस्वालने ३९ धावा केल्या. केकेआरसाठी वरुण चक्रवर्ती आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत उत्कृष्ट गोलंदाजी केली. सुनील नरेननेही २ बळी घेतले. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताची दमछाक झाली होती. मात्र कोलकाताचा स्टार खेळाडू रिंकू सिंहने राजस्थानच्या हातातून ही मॅच खेचून आणत कोलकातासाठी पहिल्या विजयाची नोंद केली. 

RR vs KKR: वैभव सूर्यवंशीची ‘शिकार’ करताच वरूण चक्रवर्तीने रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये बनवला रेकॉर्ड

ईडन गार्डन्सवरील चाहते खुष

4,4,0,6 BY RINKU SINGH IN THE 20th OVER TO FINISH THE MATCH 🫡 – The finisher of KKR is back. pic.twitter.com/qF0760YjY4 — Johns. (@CricCrazyJohns) April 19, 2026

इंडियन प्रीमियर लीग २०२६ चा २८ वा सामना आज, १९ एप्रिल रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात राजस्थानने ९ गडी गमावून १५५ धावा केल्या. कोलकाताने १५६ धावांचे लक्ष्य १९.४ षटकांत पूर्ण केले. या हंगामातील कोलकाताचा हा पहिला विजय आहे, तर राजस्थानला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. रिंकू सिंह या सामन्याचा हिरो ठरला आणि त्याची खेळी पाहून ईडन गार्डन्सवरील प्रेक्षकही खुष झाले असल्याचे दिसून आले.

रिंकू सिंगने अखेर केकेआरला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात नऊ धावांची गरज असताना, रिंकू सिंगने पहिल्या दोन चेंडूंवर दोन चौकार मारून केकेआरचा विजय जवळजवळ निश्चित केला. त्यानंतर त्याने षटकाच्या चौथ्या चेंडूवर एक शानदार षटकार ठोकून आपल्या संघासाठी सामना जिंकून दिला. राजस्थानच्या जिंकण्याच्या आशा रिंकू सिंगच्या खेळामुळे मावळल्या.

RR vs KKR: कार्तिक त्यागी नावाचे वादळ, ईडन गार्डन्समध्ये कमाल; एकाच ओव्हरमध्ये ३ विकेट्स, 155 धावांमध्ये RR ला रोखले

अनुकूल रॉयने दिली साथ 

रिंकू सिंगच्या खेळाला अनुकूल रॉयनेही साथ दिली. एका क्षणाला कोलकाताच्या हातून ही मॅच निसटणार आहे असं वाटत असताना रिंकू आणि अनुकूलने अत्यंत संयमी खेळ करत कोलकाताला पहिला विजय मिळवून दिला. या हंगामातील कोलकाताचा हा पहिलाच विजय आहे. यामुळे चाहतेही खुष झाले आहेत.

Web Title: Ipl 2026 kkr vs rr live updates kolkata knight riders won the match by 4 wickets against rajasthan royals first win

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 07:35 PM

Topics:  

  • IPL 2026
  • KKR vs RR
  • Rinku Singh

संबंधित बातम्या

PKBS vs LSG Live Updates: Connolly – प्रियांशच्या झंझावातात ‘नवाब’ झुकले, गोलंदाजीचा निर्णय चुकणार? ‘पंत’सेना गपगार
1

PKBS vs LSG Live Updates: Connolly – प्रियांशच्या झंझावातात ‘नवाब’ झुकले, गोलंदाजीचा निर्णय चुकणार? ‘पंत’सेना गपगार

IPL 2026 मध्ये काळी जादू! लिंबावर मारली फुंकर अन् शिवम दुबे आऊट, Video Viral
2

IPL 2026 मध्ये काळी जादू! लिंबावर मारली फुंकर अन् शिवम दुबे आऊट, Video Viral

PBKS vs LSG Live Score: लखनौने जिंकली नाणेफेक, पंजाब करणार पहिले फटकेबाजी; बॅटिंगचा निर्णय
3

PBKS vs LSG Live Score: लखनौने जिंकली नाणेफेक, पंजाब करणार पहिले फटकेबाजी; बॅटिंगचा निर्णय

RR vs KKR: वैभव सूर्यवंशीची ‘शिकार’ करताच वरूण चक्रवर्तीने रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये बनवला रेकॉर्ड
4

RR vs KKR: वैभव सूर्यवंशीची ‘शिकार’ करताच वरूण चक्रवर्तीने रचला इतिहास, T20 क्रिकेटमध्ये बनवला रेकॉर्ड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.