नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सचा फलंदाजी करण्याचा निर्णय (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्याची नाणेफेक दुपारी ३:०० वाजता झाली आणि सामना दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमध्ये एक रोमांचक सामना अपेक्षित आहे. आतापर्यंत कोलकाताने एकही सामना जिंकलेला नाही. तर वैभव सूर्यवंशी मागच्या मॅचमध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये आऊट झाला होता. त्यामुळे दोन्ही संघ जीव ओतून हा सामना खेळतील यात काडीमात्र शंका नाही.
कुठे पाहू शकता सामना?
चाहते कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट पाहू शकतात. जिओहॉटस्टार ॲप आणि त्याच्या वेबसाइटवर थेट प्रक्षेपण (लाइव्ह स्ट्रीमिंग) उपलब्ध असेल. संपूर्ण वेळ तुम्हाला हा सामना पाहता येणार आहे.
आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सला अद्याप एकही सामना जिंकता आलेला नाही. त्यांनी खेळलेल्या सहा सामन्यांपैकी पाच सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. त्यामुळे पॉईंट्स टेबलमध्ये कोलकाता सध्या सर्वात शेवटच्या स्तरावर आहे.
KKR vs RR: वैभव सूर्यवंशी कोणता रेकॉर्ड तोडणार? 15 वर्षाच्या या खेळाडूची नजर इतिहास रचण्यावर
वैभववर असणार नजर
राजस्थान रॉयल्सच्या १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीवर सर्वांच्या नजरा असतील. त्याने या हंगामात अव्वल क्रमांकाच्या गोलंदाजांविरुद्ध आक्रमक फलंदाजी केली आहे. हैदराबादविरुद्धच्या मागील सामन्यात तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला असला तरी, तो कोलकातासाठी एक मोठा धोका ठरू शकतो. वैभव सूर्यवंशी हा कधीच बॉलरकडे बघून खेळत नाही त्यामुळे कधीच घाबरून खेळत नाही. त्याचे लक्ष संपूर्णतः चेंडूवर असते आणि आपल्याला जास्तीत जास्त किती धावा करता येतील हेच वैभवचे लक्ष्य असते त्यामुळे सध्या सगळेच संघ वैभवला घाबरून असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान मागची मॅच हैदराबादविरूद्ध राजस्थान रॉयल्स हरले आहेत आणि हा पराभव त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. आतापर्यंत लागोपाठ मॅच जिंकून RR ने आपले पहिले स्थान टिकवून ठेवले होते. मात्र आता गुणतालिकेत हा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाव वैभव सूर्यवंंशी ऑरेंज कॅप मिळविण्याचाही मानकरी आहे. त्यामुळे त्याला या मॅचमध्ये ही संधी नक्कीच चालून आली आहे.
राजस्थान रॉयल्स की प्लेइंग 11
RR: वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयसवाल, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), रियान पराग (कॅप्टन), शिमरन हेटमायर, डोनोवन फरेरा, रविंद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, रवि बिश्नोई
कोलकाता नाइटराइडर्स की प्लेइंग 11
KKR: अजिंक्य रहाणे (कॅप्टन), टिम सीफर्ट (विकेटकिपर), कॅमरून ग्रीन, रोवमॅन पॉवेल, रिंकू सिंह, सुनील नरेन, रमनदीप सिंह, अनुकूल रॉय, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी, वरुण चक्रवर्ती






