Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?

Orange-Purple Cap Race IPL 2026: आयपीएल २०२६ मध्ये ऑरेंज आणि पर्पल कॅपसाठी चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. ऑरेंज-पर्पल कॅपच्या शर्यतीत उलथापालथ झाल्यामुळे फायनल सामन्यात याचे मानकरी कोण होणार हे चित्र स्पष्ट होईल.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 30, 2026 | 03:44 PM
RCB vs GT Final: ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार! भुवीला मोठा झटका; गिल-सुदर्शन आमनेसामने, कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?
Follow Us
Follow Us:
  • ऑरेंज-पर्पल कॅपसाठी महाथरार
  • भुवीला मोठा झटका
  • कोणाच्या डोक्यावर सजणार ताज?
इंडियन प्रीमियर लीग 2026 आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून क्रिकेट चाहत्यांचे लक्ष केवळ ट्रॉफीकडेच नाही, तर ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीकडेही लागले आहे. यंदाच्या हंगामात अनेक खेळाडूंनी दमदार कामगिरी केली, पण फलंदाजी आणि गोलंदाजीतील सर्वोत्तम खेळाडू ठरण्यासाठी आता अंतिम सामन्यात निर्णायक लढत पाहायला मिळणार आहे. अंतिम सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार असून या सामन्यानंतरचऑरेंज-पर्पल कॅप पुरस्कारांचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Vaibhav Sooryavanshi: ‘IPL गाजवलं, आता टीम इंडियासाठी पूर्णपणे सज्ज’, वैभव सूर्यवंशीबद्दल कुमार संगकाराचे मोठे विधान

गिल अन् साई सुदर्शनमध्ये स्पर्धा

ऑरेंज कॅपच्या शर्यतीत गुजरात टायटन्सचे कर्णधार शुभमन गिल आणि युवा फलंदाज साई सुदर्शन यांच्यात जोरदार स्पर्धा आहे. दोन्ही खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिले. शुभमन गिलने आपल्या आक्रमक शैलीत मोठ्या धावा केल्या, तर साई सुदर्शनने शांत आणि संयमी खेळी करत सर्वांचे लक्ष वेधले. अंतिम सामन्यात कोण मोठी खेळी करतो, यावर ऑरेंज कॅपचा निकाल अवलंबून असणार आहे.

आयपीएल २०२६ ऑरेंज कॅप लीडरबोर्ड (टॉप ५)

  • वैभव सूर्यवंशी (RR) – ७७६ धावा
  • शुभमन गिल (GT) – ७२२ धावा
  • साई सुदर्शन (GT) – ७१० धावा
  • हेनरिक क्लासेन (SRH) – ६२४ धावा
  • इशान किशन (SRH) – ६०२ धावा

भुवनेश्वरने गमावली ऑरेंज कॅप

दुसरीकडे, पर्पल कॅपच्या शर्यतीतही मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत आरसीबीचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आघाडीवर होता. मात्र क्वालिफायर २ नंतर मात्र गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने क्वालिफायर सामन्यात शानदार गोलंदाजी करत त्याला मागे टाकले. रबाडाने महत्त्वाच्या क्षणी विकेट्स घेत संघाला अंतिम फेरीत पोहोचवण्यात मोठे योगदान दिले. भुवनेश्वर कुमारने यंदाच्या हंगामात अत्यंत उत्कृष्ट  गोलंदाजी केली असून त्याचा इकॉनॉमी रेटही चांगला राहिला आहे. त्यामुळे अंतिम सामन्यात तो पुन्हा पर्पल कॅप मिळवतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

आयपीएल २०२६ पर्पल कॅप लीडरबोर्ड (टॉप ५)

  • कागिसो रबाडा (GT) – २८
  • भुवनेश्वर कुमार (RCB) – २६
  • जोफ्रा आर्चर (RR) – २५
  • अंशुल कंबोज (CSK) – २१
  • इशान मलिंगा (SRH) – २०
IPL 2026 चा अंतिम सामना केवळ ट्रॉफीसाठीच नव्हे, तर वैयक्तिक पुरस्कारांच्या निर्णायक लढतीसाठीही खास ठरणार आहे. ऑरेंज कॅप कोण जिंकणार आणि पर्पल कॅप कोणाच्या डोक्यावर राहणार, याचा फैसला आता अंतिम सामन्यात होणार आहे.

Asian Game: विनेश फोगाट आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निवड चाचणीसाठी दाखल; 53 किलो वजनी गटात स्पर्धा; IG स्टेडियमला छावणीचे स्वरूप

Web Title: Ipl 2026 orange purple cap race shubman gill sai sudharsan bhuvneshwar kumar rabada final cricket marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 03:44 PM

Topics:  

  • Bhuvaneshwar Kumar
  • IPL 2026
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

Indian Cricket Team: कर्णधार आणि फॉर्मेट बदलातच जिंकली भारतीय टीम, आता नजर सिरीजच्या विजयावर
1

Indian Cricket Team: कर्णधार आणि फॉर्मेट बदलातच जिंकली भारतीय टीम, आता नजर सिरीजच्या विजयावर

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला
2

IND vs ENG: एड्जबॅस्टनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय; इंग्लंडचा ११ वर्षांचा गड अखेर ढासळला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.