Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Football विश्वात खळबळ! इराणची FIFA World Cup 2026 मधून माघार; अमेरिकेसोबतच्या तणावामुळे टोकाचा निर्णय

इराणने फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. अमेरिकेसोबतचा तणाव आणि राजकीय कारणांमुळे घेतलेल्या या निर्णयामुळे फुटबॉल विश्वात मोठी खळबळ उडाली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 11, 2026 | 10:01 PM
इराणची FIFA World Cup 2026 मधून माघार (Photo Credit- X)

इराणची FIFA World Cup 2026 मधून माघार (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • फुटबॉल विश्वात खळबळ!
  • इराणची फिफा वर्ल्ड कप २०२६ मधून माघार
  • अमेरिकेसोबतच्या तणावामुळे टोकाचा निर्णय
मध्य पूर्वेतील वाढता लष्करी तणाव आणि राजकीय अस्थिरतेचा मोठा फटका आता क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. इराणने आगामी २०२६ फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup 2026) स्पर्धेतून आपले नाव अधिकृतपणे मागे घेतले आहे. पुढील वर्षी अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या तीन देशांमध्ये संयुक्तपणे हा फुटबॉल महाकुंभ आयोजित केला जाणार आहे. मात्र, अमेरिकेसोबत असलेल्या तीव्र राजकीय मतभेदांमुळे इराणने या जागतिक स्पर्धेत सहभागी न होण्याचा टोकाचा निर्णय घेतला आहे.

खेळ मंत्र्यांनी केली निर्णयाची घोषणा

इराणचे क्रीडा मंत्री अहमद दोनजामाली यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर या निर्णयाची अधिकृत घोषणा केली. “सध्याच्या परिस्थितीचा विचार करता, इराणच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाने अमेरिकेत जाऊन खेळणे शक्य नाही. आम्ही २०२६ च्या विश्वचषकात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या निर्णयामागे केवळ क्रीडा निकष नसून गंभीर राजकीय कारणे असल्याचेही त्यांनी नमूद केले. सर्वोच्च नेत्यांच्या हत्येचा संदर्भ आणि सरकारचा आक्रमक पवित्रा इराणने हा कडक निर्णय घेण्यामागे त्यांचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांच्या हत्येचा संदर्भ दिला आहे.

BREAKING: Iran’s sports minister said Iran cannot participate in the 2026 World Cup after the US killed their leader. ‘Considering that this corrupt regime has assassinated our leader, under no circumstances can we participate in the World Cup’ https://t.co/eMf8m46e8e pic.twitter.com/UbZvLDhabj — Reuters (@Reuters) March 11, 2026


क्रीडा मंत्र्यांनी आपल्या निवेदनात थेट आरोप केला की, “ज्या सरकारने आमच्या सर्वोच्च नेत्याची हत्या केली आहे, त्या सरकारच्या देशात जाऊन विश्वचषक खेळण्याचा आमचा कोणताही इरादा नाही.” तसेच, गेल्या ८ ते ९ महिन्यांत इराणवर दोन युद्धे लादली गेली असून, त्यामध्ये हजारो निरपराध नागरिकांचा बळी गेल्याचा दावाही इराण सरकारने केला आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इराणने जागतिक क्रीडा मंचावरून माघार घेण्याचे पाऊल उचलले आहे.

आशिया कपमध्ये Iranच्या महिला फुटबॉल टीमचा ‘मौन विद्रोह’, राष्ट्रगीताला केलं बॉयकॉट, VIDEO VIRAL

फिफा आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना झटका

इराणच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघ (FIFA) अडचणीत सापडला आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच फिफाचे अध्यक्ष जियानी इन्फेंटिनो यांनी व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर ट्रम्प यांनी इराणच्या संघाचे अमेरिकेत स्वागत केले जाईल, असे आश्वासन दिले असल्याचे इन्फेंटिनो यांनी सोशल मीडियावर सांगितले होते. मात्र, इराणच्या ताज्या भूमिकेमुळे अमेरिकेचे हे राजनैतिक प्रयत्न व्यर्थ ठरले आहेत.

इराणच्या जागी कोणाला मिळणार संधी?

आता फुटबॉल प्रेमींमध्ये सर्वात मोठी चर्चा ही आहे की, इराणच्या जागी कोणत्या देशाला विश्वचषकात स्थान मिळेल. फिफाच्या नियमांनुसार, जर एखादा देश स्पर्धेतून माघार घेतो किंवा त्याला बाहेर काढले जाते, तर दुसऱ्या संघाची निवड करण्याचा सर्वस्वी अधिकार फिफाकडे असतो.
२०२६ चा विश्वचषक हा इतिहासातील सर्वात मोठा विश्वचषक ठरणार आहे, कारण यामध्ये प्रथमच ४८ संघ सहभागी होणार आहेत. अशा मोठ्या स्पर्धेतून इराणसारखा प्रबळ संघ बाहेर पडणे हा फुटबॉल चाहत्यांसाठी आणि आयोजकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Football खेळाडूंच्या समर्थनार्थ उतरले अरविंद केजरीवाल, खेळांमध्ये राजकारण नाही तर पारदर्शकता हवी…

Web Title: Iran national team withdraws from fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 10:01 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • iran
  • Iran Israel Conflict
  • Sports News

संबंधित बातम्या

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
1

कारंजा तालुकास्तरीय स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मैदान गाजवलं! धावेकर विद्यालयाच्या पाच खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड
2

Wrestling: जुन्नरमध्ये कुस्तीचा थरार! समर्थ क्रीडा संकुलातील ११ मल्लांची पुणे जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन
3

शालेय खेळाडू मैदानात घालणार धुमाकूळ! PCMC मध्ये Basketball स्पर्धेचे दिमाखदार उद्घाटन

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक
4

Asian Games 2026: कोण आहे Suchika Tariyal? 700 ग्रॅमने हुकलं फायनल पण इतिहास रचला; भारताला MMA मध्ये पहिलं ऐतिहासिक पदक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.