
Ishan Kishan Double Century
दुसऱ्या दिवशी, किशन आणि कुशाग्र यांनी आपला डाव पुढे चालू ठेवला. साऊथ झोनच्या गोलंदाजांना त्यांनी चागंलेच धुतले. कुशाग्रने १३२ चेंडूंमध्ये १०१ धावा करून शानदार शतक ठोकले. परंतु, यानंतर लगेच तिरुपुरना विजयने त्याची विकेट घेतली. ईशानने त्याला चांगली साथ दिली. दोघांनी मिळून २३० धावांची भागीदारी केली. ईशानने आपला डाव पुढे चालू ठेवत धमाकेदार द्विशतक झळकावले. या स्पर्धेत द्विशतक झळकावणारा तो ईस्ट झोनचा तिसरा फलंदाजही ठरला. त्याच्या आधी अरुणलाल आणि साबा यांनी द्विशतकाच्या जवळपास धावा केल्या होत्या. किशनच्या खेळीमुळे ईस्ट झोनने आपली धावसंख्या ५५० च्या पुढे नेली. साऊथ झोनचा संघ आता पूर्णपणे दबावाखाली आहे.
ईशान किशनने पहिल्या दिवशी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा निर्णय योग्य ठरला. वैभव सूर्यवंशी आणि अभिमन्यू ईश्वरन यांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. दोघांनीही वेगाने धावा केल्या. वैभव ४४ धावांवर बाद झाला. ईश्वरननेही ८६ चेंडूंमध्ये ७२ धावा केल्या. शिखर मोहननेही ८५ धावांचे योगदान दिले. कर्णधार इशान किशन आणि कुमार कुशाग्र यांनी चांगली फलंदाजी केली. किशनने शानदार शतक झळकावून पहिला दिवस आपल्या नावावर केला. दिवसाचा खेळ संपला तेव्हा, किशन १११ धावांवर आणि कुशाग्र ६३ धावांवर नाबाद होते. किशनने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपल्या ४००० धावा देखील पूर्ण केल्या.
ईस्ट झोन: अभिमन्यू इसवरन, वैभव सूर्यवंशी, कुमार कुशाग्रा, सुदीप कुमार घरामी, ईशान किशन (विकेटकीपर/कर्णधार), शिखर मोहन, अनुकुल रॉय, मोहम्मद कौनैन कुरेशी, मोहम्मद शामी, अभिजित के सरकार, मुकेश कुमार
साऊथ झोन: रिकी भुई, नारायण जगदीसन (विकेटकीपर), देवदत्त पडिक्कल, शेख रशीद, तिलक वर्मा (कर्णधार), स्मरण रविचंद्रन, श्रेयस गोपाल, त्रिपुराना विजय, मोहम्मद सिराज, चामा व्ही मिलिंद, एमडी निधिश