
Anniversary of Jayaraj Sports Center
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवकांनी क्रीडा क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन करत ‘खेलेगा इंडिया, खिलेगा इंडिया’ या भावनेतून देशात क्रीडा संस्कृती रुजविण्यावर सातत्याने भर दिला आहे. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच शिस्त, संघभावना, आत्मविश्वास आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. याच दृष्टिकोनातून जयराज क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त बुद्धिबळ, कॅरम, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या क्रीडा प्रकारांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बुद्धिबळ स्पर्धेतील १८ वर्षांखालील गटात क्रिसिल शहा आणि क्रिशांग शहा यांनी विजेतेपद मिळविले. तर १८ वर्षांवरील गटात प्रकाश ओसवाल आणि रणजीत शहा यांनी बाजी मारली.कॅरम स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात हृदान मेहेर आणि विहान मेहेर यांनी, तर १८ वर्षांवरील गटात मयूर मेहेर आणि सौरभ शहा यांनी उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद पटकावले.टेबल टेनिस स्पर्धेच्या १८ वर्षांखालील गटात अर्थ रुणवाल आणि आदिव शाह यांनी विजेतेपद मिळविले. १८ वर्षांवरील गटात अनुप मेहेर आणि प्रितेश मेहता यांनी बाजी मारली. तसेच ६० वर्षांवरील गटात विलास शहा आणि रणजीत शहा यांनी विजेतेपदावर आपले नाव कोरले.
बॅडमिंटनच्या पुरुष विभागातील विविध वयोगटांमध्ये अर्णव शहा, लॅव्हन पटेल, अर्थ रुणवाल, रिदान प्रथम पारेख, तुषार राठोड, व्रजेश शहा आणि राजेश पारेख यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपापल्या गटात विजेतेपद मिळविले.महिला विभागात प्रियाल शहा, पूजा गांधी आणि स्नेहल शहा यांनी प्रभावी खेळाचे प्रदर्शन करत आपापल्या गटात विजेतेपद पटकावले.
स्पर्धेतील कामगिरीबरोबरच क्रीडा क्षेत्रातील उत्साह, सहभाग आणि खिलाडूवृत्तीचाही विशेष गौरव करण्यात आला. स्मित संघवी यांना ‘बेस्ट स्पोर्टिंग अवॉर्ड’, हसमुख पटेल यांना ‘सीनियर स्टार अवॉर्ड’, तर माहित शहा यांना ‘यंगेस्ट पार्टिसिपेंट अवॉर्ड’ देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेतील विजेत्यांना श्री पूना गुजराती बंधू समाजाचे मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. राजेश शहा, जॉइंट मॅनेजिंग ट्रस्टी नैनेश नंदू, सेक्रेटरी राजेंद्र शहा तसेच ट्रस्टी दिलीप मेहता आणि पंकज डेडिया यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
Table Tennis सरळ सेटमध्ये एकतर्फी विजय! रुचिता धारवटकर ठरली चॅम्पियन, दिया शिंदेचा तब्बल…
“वर्धापन दिनानिमित्त झालेल्या या स्पर्धांमुळे विविध वयोगटांतील खेळाडूंना एकाच व्यासपीठावर आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. त्याचबरोबर सभासदांमध्ये क्रीडाविषयक आवड वाढविणे, नियमित खेळासाठी प्रोत्साहन देणे आणि खिलाडूवृत्ती दृढ करण्याचा उद्देशही या उपक्रमातून साध्य झाला.”
— राजेश शहा, मॅनेजिंग ट्रस्टी, श्री पूना गुजराती बंधू समाज