Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मैदानावर वैर, बाहेर मैत्री? भारतीय क्रिकेटरने पाक क्रिकेटपटूला मारली मिठी; Viral Video मुळे सोशल मीडियावर मोठा वाद

jemimah rodrigues hug fatima sana viral video: इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेतील एका सामन्यानंतर भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स आणि पाकिस्तानी अष्टपैलू फातिमा सना एकमेकींना मिठी मारताना दिसल्या. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 01, 2026 | 04:48 PM
मैदानावर वैर, बाहेर मैत्री? भारतीय क्रिकेटरने पाक क्रिकेटपटूला मारली मिठी; Viral Video मुळे सोशल मीडियावर मोठा वाद
Follow Us
Follow Us:
  • जेमिमा आणि फातिमा यांनी मारली मिठी
  • Viral Video मुळे सोशल मीडियावर मोठा वाद
  • तणावाचा क्रिकेटवरही परिणाम
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ‘द हंड्रेड’ या महिला फ्रँचायझी स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानच्या दोन महिला क्रिकेटपटूंची भेट चर्चेचा विषय बनली आहे. सदर्न ब्रेव्ह संघाकडून खेळणाऱ्या भारतीय फलंदाज जेमिमा रॉड्रिग्जने सामन्यानंतर बर्मिंगहॅम फिनिक्स संघाची खेळाडू आणि पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू फातिमा सनाला मिठी मारली. दोन्ही खेळाडूंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

CWC 2026: फास्ट बॉलर बनायचं स्वप्न, पण नशिबाने खेळ बदलला; डेकॅथलॉनमध्ये भारताला कांस्यपदक जिंकवणारा Tejaswin Shankar कोण?

जेमिमा आणि फातिमा यांनी मारली मिठी

ही घटना इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या ‘द हंड्रेड लीग’शी संबंधित आहे. स्पर्धेचा १३वा सामना सदर्न ब्रेव्ह आणि बर्मिंगहॅम फिनिक्स यांच्यात खेळला गेला. रॉड्रिग्ज सदर्न ब्रेव्हकडून, तर फातिमा सना फिनिक्सकडून खेळते.सामना संपल्यानंतर दोन्ही संघांच्या खेळाडूंनी एकमेकांशी हँडशेक केले. यावेळी जेमिमा आणि फातिमाने एकमेकींना अभिवादन केले आणि मिठीही मारली. या घटनेची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहे. तसेच , नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. परंतु, ही भेट फ्रँचायझी क्रिकेटचा एक भाग होती, जिथे वेगवेगळ्या देशांचे खेळाडू एकाच संघासाठी किंवा विरोधी संघांसाठी खेळतात.

Everyone debating if Fatima Sana and jemimah Rodrigues would shake hands and they straight up HUGGED?!😭😭🙏 Keep politics out of sports FOREVER.#Cricket
pic.twitter.com/UJrU9wOt1W
— Cricket Guru (@CricketGuru_CG) July 31, 2026

भारत- पाकिस्तानमधील तणावाचा क्रिकेटवरही परिणाम

भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय तणावाचा परिणाम क्रिकेटवरही झाला आहे. २०२५ मध्ये झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढले. यानंतर, भारतीय क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबतच्या औपचारिक संवादाबाबत सावध भूमिका घेतली. गेल्या वर्षापासून, भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी मोठ्या स्पर्धांदरम्यान हँडशेक करणे टाळले आहे.

सदर्न ब्रेव्हने जिंकला सामना

प्रथम फलंदाजी करताना, सदर्न ब्रेव्ह संघाने तीन विकेट्स गमावून १४० धावा केल्या. लिझेल लीने ४३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली आणि माया बुशियरने ४५ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. अखेरीस, जेमिमा रॉड्रिग्जने अवघ्या १८ चेंडूंमध्ये नाबाद २८ धावा करून संघाला एका भक्कम धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दुसरीकडे, फातिमा सना गोलंदाजीत महागडी ठरली. तिने १५ चेंडूंच्या स्पेलमध्ये ३३ धावा दिल्या. बर्मिंगहॅम फिनिक्सकडून अलाना किंग आणि ॲलिस कॅप्सी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

१४१ धावांचे लक्ष्य गाठताना बर्मिंगहॅम फिनिक्सने चांगली सुरुवात केली. टॅमी ब्यूमोंट आणि डेविना पेरिन यांनी पहिल्या विकेटसाठी ७३ धावांची भागीदारी केली. पेरिनने ४३ चेंडूंमध्ये ५२ धावा केल्या, तर ब्यूमोंटने २२ धावा केल्या. मात्र, या दोघी बाद झाल्यानंतर डाव अडखळला. सारा ग्लेन, लॉरेन बेल आणि सोफी मोलिन्यू यांच्या अचूक गोलंदाजीसमोर फिनिक्स संघ निर्धारित १०० चेंडूंमध्ये पाच गडी गमावून केवळ ११६ धावाच करू शकला. विजयासह सदर्न ब्रेव्हने चालू हंगामातील आपला सलग चौथा विजय नोंदवला.

CWG 2026: वडिलांचे स्वप्न, मुलाचा पराक्रम! शेवटच्या थ्रोने जिंकले कांस्यपदक; कोण आहे भारताचा नवा स्टार Yashvir Singh?

Web Title: Jemimah rodrigues fatima sana hug viral video the hundred women 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:48 PM

Topics:  

  • Fatima Sana
  • IND VS PAK
  • India vs Pakistan
  • Jemimah Rodrigues

संबंधित बातम्या

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत
1

IND Vs PAK: पाकड्यांची लाज पुन्हा जाणार! भारत-पाक पुन्हा भिडणार, ‘या’ स्पर्धेत पंजाबमध्ये लढत

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
2

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.