Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Hockey स्पर्धेत उडाली खळबळ! फायनलच्या ट्रॉफीवर कोण कोरणार नाव? झारखंड की हरियाणा?

रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी हॉकी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हॉकी यांच्यात सामना रंगणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 22, 2026 | 08:03 PM
Hockey India Competition

Hockey India Competition

Follow Us
Follow Us:

झारखंडचा मध्य प्रदेशवर शूटआऊटमध्ये संघर्षपूर्ण विजय
हरियाणाकडून छत्तीसगडचा ८-० असा धुव्वा
हॉकी झारखंड, हॉकी हरियाणा अंतिम फेरीत

पुणे: १६व्या हॉकी इंडिया कनिष्ठ महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा यांनी उपांत्य फेरीतील सामने जिंकत अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. नेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यांमध्ये झारखंडने हॉकी मध्य प्रदेशवर शूटआऊटमध्ये संघर्षपूर्ण विजय मिळविला, तर हॉकी (Sports) हरियाणाने छत्तीसगड हॉकीचा तब्बल ८-० असा एकतर्फी पराभव केला.

रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात हॉकी झारखंड आणि हॉकी हरियाणा यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. तसेच तिसऱ्या क्रमांकासाठी हॉकी मध्य प्रदेश आणि छत्तीसगड हॉकी यांच्यात सामना रंगणार आहे. ही स्पर्धा हॉकी महाराष्ट्राच्या आयोजनाखाली, हॉकी इंडियाच्या मार्गदर्शनाखाली आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे.

झारखंडचा शूटआऊटमध्ये थरारक विजय

शनिवारी झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात हॉकी झारखंडने हॉकी मध्य प्रदेशवर शूटआऊटमध्ये मात करत अंतिम फेरी गाठली. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी एक गोल केल्याने सामना १-१ असा बरोबरीत राहिला. हॉकी मध्य प्रदेशकडून काजल हिने १५व्या मिनिटाला गोल नोंदवत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर मध्य प्रदेशने ही आघाडी अखेरपर्यंत टिकवून ठेवण्याचा प्रयत्न केला.

Hockey India स्पर्धेत ‘या’ चार संघाची सेमीफायनलमध्ये धडक; पिंपरीत पाहायला मिळतोय हॉकीचा संग्राम

मात्र, सामन्याच्या अगदी अखेरच्या क्षणी हॉकी झारखंडने जोरदार पुनरागमन केले. होरो एस्तेर हिने ६०व्या मिनिटाला गोल नोंदवत झारखंडला १-१ अशी बरोबरी साधून दिली आणि सामना शूटआऊटमध्ये गेला. शूटआऊटमध्ये हॉकी झारखंडकडून सलोमी नाग आणि राजणी केरकेट्टा यांनी अचूक गोल नोंदवले. हॉकी मध्य प्रदेशकडून केवळ काजल हिलाच गोल करता आला. त्यामुळे झारखंडने शूटआऊटमध्ये सरशी साधत अंतिम फेरीतील आपले स्थान निश्चित केले.

Hockey Competition: हॉकीत चंदीगड अन् मध्य प्रदेशचा बोलबाला; महाराष्ट्राला मात्र पराभवाचा धक्का

हरियाणाचा ८-० असा दणदणीत विजय

दुसऱ्या उपांत्य सामन्यात हॉकी हरियाणाने छत्तीसगड हॉकीवर सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवत ८-० असा दणदणीत विजय मिळविला. हरियाणाच्या आक्रमक खेळापुढे छत्तीसगडच्या बचावफळीचा निभाव लागला नाही.हरियाणाकडून शशी खासाने हॅट्ट्रिक नोंदवत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तिने ४५व्या, ५७व्या आणि ५९व्या मिनिटाला गोल करत छत्तीसगडच्या बचावफळीला पूर्णपणे निष्प्रभ केले.अंजनीनेही उत्कृष्ट कामगिरी करत दोन गोल नोंदवले. तिने सामन्याच्या ७व्या आणि ५८व्या मिनिटाला गोल केले. याशिवाय भव्या हिने ९व्या मिनिटाला, दीक्षा हिने ११व्या मिनिटाला, तर सुखप्रीत कौर हिने ३५व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल नोंदवत हरियाणाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

Web Title: Jharkhand haryana in final of 2026 hockey india junior womens national championship pune news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 08:03 PM

Topics:  

  • Hockey
  • pune news
  • Sports News

संबंधित बातम्या

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण;  ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे
1

MPSC Protest Pune: पुण्यात MPSC आंदोलनाला नवीन वळण; ३ विद्यार्थ्यांचे उपोषण मागे

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी
2

सुपरक्रॉस रेसिंगचा धुमाकूळ! ४ रेसिंग गटांत २१ देशांतील रायडर्स दाखवणार ताकद; नोंदणी प्रक्रिया यशस्वी

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक
3

बालपणीचं स्वप्न, ऐतिहासिक मैदान! दिल्लीच्या ‘होम कोर्स’वर पुन्हा चमकण्यासाठी शुभंकर शर्मा उत्सुक

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक
4

Nana Patekar: ‘नटसम्राट’ हरपला! ‘नाना गरिबांची कायम…’; फार्महाऊसवरील जाधव झाले भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.