फोटो सौजन्य - Durand Cup सोशल मीडिया
नॉर्थईस्ट युनायटेड एफसी : ड्युरंड कप २०२४ चा काल फायनलचा सामना पार पडला. या सामन्यामध्ये जॉन अब्राहमच्या फुटबॉल संघ नॉर्थईस्ट युनायटेड एफसीने २०२४ ड्युरंड कप जिंकून इतिहासात नाव कोरल आहे. संघाने अंतिम सामन्यात मोहन बागान सुपर जायंट या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघाचा पराभव केला. कोलकात्याच्या सॉल्ट लेक स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी २ गोल केले. यानंतर, पेनल्टी शूटआउटद्वारे चॅम्पियनचा निर्णय घेण्यात आला, ज्यामध्ये नॉर्थईस्ट युनायटेडने सामना ४-३ ने हा सामना जिंकला आणि ट्रॉफी नावावर केली. गुरमीत सिंग या सामन्याचा हिरो ठरला, त्याने शानदार गोल वाचवले. संघाचे हे पहिले मोठे यश आहे. या ऐतिहासिक विजयापर्यंत पोहोचण्यात संघाचे मालक जॉन अब्राहमने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
THE CHAMPIONS! 🏆🏆🏆
The historic championship moment in the club’s history! #StrongerAsOne #8States1United #champion #IndianOilDurandCup pic.twitter.com/NLrSDb5Nxs
— NorthEast United FC (@NEUtdFC) September 1, 2024
ड्युरंड कपच्या 133 वर्षे जुन्या इतिहासात मोहन बागान हा सर्वात यशस्वी संघ आहे. या संघाने 17 वेळा हे विजेतेपद पटकावले आहे. तसेच ती १४ वेळा उपविजेती ठरली आहे. इतकेच नाही तर मोहन बागान हा भारतातील सर्वात जुना क्लब आहे, जो जवळपास १३५ वर्षांपासून आहे. अशा संघाचा पराभव करून विजेतेपद मिळवणे नॉर्थईस्ट युनायटेडसाठी सोपे नव्हते. नॉर्थईस्ट युनायटेडचा प्रवास अडचणींनी भरलेला आहे.
जॉन अब्राहमप्रमाणेच अनेक बॉलीवूड आणि क्रिकेट स्टार्सही फुटबॉल क्लबचे मालक आहेत. मात्र ड्युरंड चषक जिंकण्यात त्यांच्या संघाला कधीच यश आले नाही. महेंद्रसिंग धोनी आणि अभिषेक बच्चन यांची चेन्नईयन एफसीमध्ये हिस्सेदारी आहे. तर रणबीर कपूरकडे मुंबई सिटी एफसीचे मालकी हक्क आहेत. यापैकी एकाही संघाने ड्युरंड कप जिंकलेला नाही. मात्र, विराट कोहलीच्या गोवा एफसीने एकदाच हे विजेतेपद पटकावले आहे.