Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 23 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्य फेंसिंगच्या रणांगणात कुचन प्रशालेचे तीन शिलेदार; अक्षय, श्वेता अन् तुलसीची चमकदार कामगिरी

Junior State Fencing Championship Amravati : अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धेत सोलापूरच्या कुचन प्रशालेच्या अक्षय कुमार पिट्टा, श्वेता विडप आणि गंधम तुलसी या तीन खेळाडूंनी सहभाग घेतला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 11, 2026 | 08:58 PM
Junior State Fencing Championship Amravati

Junior State Fencing Championship Amravati

Follow Us
Follow Us:
  • सोलापूरच्या कुचन प्रशालेचा राज्यस्तरावर डंका
  • फेंसिंग स्पर्धेत तीन खेळाडूंचा सहभाग
  • अमरावतीत कौशल्याची परीक्षा
सोलापूर : अमरावती येथे सुरू असलेल्या ३४ व्या ज्युनियर राज्य फेंसिंग अजिंक्यपद स्पर्धा २०२६ मध्ये कुचन प्रशाला, सोलापूरच्या तीन खेळाडूंनी सहभाग नोंदवून प्रशालेचे नाव राज्यस्तरावर पोहोचविले आहे. अक्षय कुमार पिट्टा, श्वेता विडप आणि गंधम तुलसी या खेळाडूंनी या प्रतिष्ठित स्पर्धेत आपल्या क्रीडा कौशल्याचे प्रदर्शन केले.अमरावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात ११ ते १३ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ही राज्यस्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील युवा फेंसिंगपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे कुचन प्रशालेच्या खेळाडूंना राज्यातील गुणवंत खेळाडूंसोबत आपले कौशल्य आजमावण्याची संधी मिळाली आहे.

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तानमध्ये T20 थरार; पहिल्या सामन्याचा काउंटडाऊन सुरू; किती वाजता रंगणार मुकाबला?

अक्षय कुमार पिट्टा याने फेंसिंगच्या एपी प्रकारात, तर श्वेता विडप आणि गंधम तुलसी यांनी फॉइल प्रकारात सहभाग घेतला. फेंसिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याच्या हालचालींचा अचूक अंदाज घेत वेगाने आक्रमण करणे आणि तितक्याच चपळाईने बचाव करणे आवश्यक असते. त्यामुळे या खेळासाठी सातत्यपूर्ण सराव, शारीरिक तंदुरुस्ती, एकाग्रता आणि मानसिक तयारी महत्त्वाची ठरते.

मेहनत, शिस्त अन् आत्मविश्वासाची साथ

कुचन प्रशालेच्या या तिन्ही खेळाडूंनी नियमित सराव आणि मेहनतीच्या जोरावर राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेतला. वेग, चपळता, अचूकता आणि निर्णयक्षमता यांचा कस पाहणाऱ्या या खेळात त्यांनी आत्मविश्वासाने आपली उपस्थिती नोंदविली.

भोसले, डॉ. महिंद्रकर यांचे मोलाचे मार्गदर्शन

या खेळाडूंना पवन भोसले सर तसेच डॉ. प्रिया नितीन महिंद्रकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळाडूंनी फेंसिंगमधील विविध तंत्रांचा नियमित सराव केला.आक्रमण, बचाव, हालचालींचा वेग आणि स्पर्धेतील आवश्यक शिस्त यावर विशेष तयारी करण्यात आली.

राज्यस्तरीय सहभागामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करावी, यासाठी अशा राज्यस्तरीय स्पर्धांमधील सहभाग महत्त्वाचा ठरतो. कुचन प्रशालेच्या तीन विद्यार्थ्यांनी फेंसिंगसारख्या कौशल्यपूर्ण खेळात राज्यस्तरावर सहभाग घेतल्याने प्रशालेच्या क्रीडा क्षेत्रातील वाटचालीला नवी दिशा मिळाली आहे. त्यांच्या सहभागामुळे इतर विद्यार्थ्यांमध्येही क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची प्रेरणा निर्माण होत आहे.

कुचन प्रशालेचे तीन शिलेदार

  • अक्षय कुमार पिट्टा – एपी प्रकार
  • श्वेता विडप – फॉइल प्रकार
  • गंधम तुलसी – फॉइल प्रकार
US Open 2026: सबालेन्काचा पेगुलाला धक्का, रायबाकिनाने गॉफला रडवलं; आता ट्रॉफीसाठी महामुकाबला

Web Title: Junior state fencing championship 2026 amravati solapur kuchan school players

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2026 | 08:58 PM

Topics:  

  • amravati
  • Solapur
  • Sports News

संबंधित बातम्या

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड
1

Sport News: जिल्हास्तरीय टेनिकोईट स्पर्धेत माणगंगा स्कूलच्या मुलींचा डंका! दोन्ही संघांची विभागीय स्तरावर निवड

Amravati News: मेळघाटात पक्ष्यांच्या १८ प्रजातींची नोंद! तारूबांदा परिसरात वनविभागाची मोहीम; जैवविविधतेची समृद्धी
2

Amravati News: मेळघाटात पक्ष्यांच्या १८ प्रजातींची नोंद! तारूबांदा परिसरात वनविभागाची मोहीम; जैवविविधतेची समृद्धी

IND vs NZ : पंत-राहुलच्या शतकांचा धमाका ! न्यूझीलंडची अवस्था बिकट, भारताची मोठी आघाडी कायम
3

IND vs NZ : पंत-राहुलच्या शतकांचा धमाका ! न्यूझीलंडची अवस्था बिकट, भारताची मोठी आघाडी कायम

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय
4

Cricket News: राज गादियाचे शतक, योगेश पवारची फटकेबाजी! डीव्हीसीएचा १७१ धावांनी दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.