Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kagiso Rabada Viral Video: गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज कागिसो रबाडा अडचणीत? हॉटेलमधील ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाचा हॉटेलमधील एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाला आहे. आयपीएल 2026 मधील या घटनेमुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले असून, रबाडाच्या शिस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 22, 2026 | 04:21 PM
गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज कागिसो रबाडा अडचणीत? (Photo Credit- X)

गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज कागिसो रबाडा अडचणीत? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • गुजरात टायटन्सचा स्टार गोलंदाज कागिसो रबाडा अडचणीत?
  • हॉटेलमधील ‘तो’ व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • पाहा व्हिडिओ…
Kagiso Rabada Viral Video News: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2026) रोमांचक टप्प्यात सध्या मैदानाबाहेरील एका घटनेने क्रीडा वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. गुजरात टायटन्सचा (GT) वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, यामध्ये तो सिगरेट ओढताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे. अद्याप या व्हिडिओची अधिकृत पुष्टी झालेली नसली, तरी चाहत्यांमध्ये मात्र यावरून उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

व्हायरल व्हिडिओचे नेमके सत्य काय?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या क्लिपमध्ये रबाडासारखी दिसणारी एक व्यक्ती सिगरेट ओढताना दिसत आहे. हा व्हिडिओ गुजरात टायटन्सच्या टीम हॉटेलमधील असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. व्हिडिओमध्ये रबाडासोबत इतरही काही व्यक्ती दिसत असून, त्या संघाशी संबंधित असल्याचे बोलले जात आहे. मात्र, हा व्हिडिओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर सध्या संभ्रमावस्था कायम आहे.

Kagiso Rabada was spotted smoking at the GT team hotel. 👀 Rashid Khan and Gujarat Titans players and staff were also there, appearing to speak with him—it looked like Rashid was trying to stop him. Was the theory about Rabada true? pic.twitter.com/0VT79nGPUU — Sonu (@Cricket_live247) April 22, 2026

पर्पल कॅपच्या शर्यतीत रबाडा सातव्या स्थानी

मैदानावर कागिसो रबाडाची कामगिरी यंदाच्या हंगामात अत्यंत प्रभावी राहिली आहे. तो सध्या पर्पल कॅपच्या शर्यतीत सातव्या क्रमांकावर आहे. त्याने आतापर्यंत 6 सामन्यांत 10 गडी बाद केले आहेत. 22.20 ची सरासरी आणि 9.73 च्या इकॉनॉमी रेटसह तो गुजरातच्या गोलंदाजीचा मुख्य आधार ठरला आहे. अशा परिस्थितीत समोर आलेल्या या वादग्रस्त व्हिडिओमुळे त्याच्या प्रतिमेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LSG Vs RR: शामी विरुद्ध Vaibhav Suryvanshi रंगणार सामना; पहा दोन्ही संघांची Playing 11

जुन्या वादाची पुन्हा चर्चा

या नवीन व्हिडिओमुळे रबाडाच्या शिस्तभंगाच्या जुन्या प्रकरणांना पुन्हा उजाळा मिळाला आहे. गेल्या आयपीएल हंगामात ‘साऊथ आफ्रिकन इन्स्टिट्यूट फॉर ड्रग फ्री स्पोर्ट्स’ने रबाडावर एका महिन्याची बंदी घातली होती. त्या काळात त्याने स्पर्धेतून तात्पुरती माघार घेतली होती. डोपिंग प्रकरणाची सविस्तर माहिती कधीही सार्वजनिक करण्यात आली नव्हती, ज्यामुळे त्यावेळीही अनेक तर्क-वितर्क लढवले गेले होते.

गुजरात टायटन्ससमोर आरसीबीचे आव्हान

गुजरात टायटन्सचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर असून प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. येत्या 24 एप्रिल रोजी बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) विरुद्ध होणार आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी रबाडाबाबतचा हा वाद संघासाठी डोकेदुखी ठरू शकतो.

यापूर्वीही क्रिकेटपटू झालेत ट्रोल

आयपीएल 2026 च्या सुरुवातीला राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याचाही अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडिओमध्ये चहल कथितरित्या धूम्रपान करत गाडी चालवताना दिसत होता. त्या प्रकरणाचीही पुष्टी झाली नव्हती, तरीही सोशल मीडियावर खेळाडूंच्या शिस्तीबाबत मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली होती.

RR Vs LSG Pitch Report: कशी असणार एकानाची खेळपट्टी; टॉस जिंकून ‘हा’ निर्णय घेतल्यास…

Web Title: Kagiso rabada viral video controversy ipl 2026 gujarat titans news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Kagiso Rabada
  • viral video

संबंधित बातम्या

ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्
1

ताई तर धुरंधर निघाल्या! लांबलचक सापाला दोरीसारखं पकडलं अन्…; VIDEO पाहून नेटकरी आवाक्

लंगड्याचं सोंग पडलं भारी! कुत्रे मागे लागताच भरधाव धावत सुटला भिकारी; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा, Video Viral
2

लंगड्याचं सोंग पडलं भारी! कुत्रे मागे लागताच भरधाव धावत सुटला भिकारी; नेटकऱ्यांनी घेतली मज्जा, Video Viral

लोकांच्या आरोग्याशी खेळ! हिरव्या रंगात बुडवून विकली जातेय काकडी? भाजीवाल्याचा कारनामा येईल संताप, Video Viral
3

लोकांच्या आरोग्याशी खेळ! हिरव्या रंगात बुडवून विकली जातेय काकडी? भाजीवाल्याचा कारनामा येईल संताप, Video Viral

धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न; रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांडून संताप व्यक्त
4

धक्कादायक! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर फेकलं अन्न; रेल्वे केटरिंग स्टाफचा VIDEO व्हायरल, नेटकऱ्यांडून संताप व्यक्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.