LSG Vs RR Playing 11 (फोटो- सोशल मिडिया)
वैभव सूर्यवंशी अन् यशस्वी जयस्वालच्या खेळीकडे लक्ष
संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार सामना
दोन्ही संघांसाठी आवश्यक असणार विजय
Tata IPL 2026 LSG Vs RR Live Updates: आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ विरुद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. हा सामना दोघांसाठी अत्यंत महत्वाचा असणार आहे. पॉईंट्स टेबलमध्ये आघाडी घेणीसाठी दोन्ही संघ विजयी होण्याचा प्रयत्न करतील. कारण दोन्ही संघ मागील काही सामन्यांपासून विजयासाठी झगडत आहेत. दोन्ही (IPL 2026) संघाची प्लेइंग 11 जाणून घेऊयात.
हेड टू हेड रेकॉर्ड
आयपीएल इतिहासात आतापर्यंत या दोन संघांमध्ये एकूण ६ सामने खेळले गेले आहेत. यामध्ये राजस्थान रॉयल्सचे वर्चस्व दिसून येते. आकडेवारी पाहता राजस्थानचे पारडे दिसून yet आहे. मात्र होम ग्राऊंड असल्याने लखनौचा संघ हा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. या सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व नवीन दमाचे खेळाडू करत आहेत. लखनौचे नेतृत्व ऋषभ पंत कडे आहे, तर राजस्थानची धुरा रियान पराग सांभाळत आहे.
लखनौसाठी पंतची फटकेबाजी महत्त्वाची ठरेल. त्याने याच मैदानावर गेल्या हंगामात शतक झळकावले होते. राजस्थानचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असून त्याने 6 सामन्यात 246 धावा केल्या आहेत. लखनौच्या प्रिन्स यादवने आतापर्यंत 11 विकेट्स घेतल्या आहेत, तर राजस्थानच्या रवी बिश्नोईने 10 विकेट्स घेतल्या आहेत.
RR Vs LSG Pitch Report: कशी असणार एकानाची खेळपट्टी; टॉस जिंकून ‘हा’ निर्णय घेतल्यास…
काय आहे आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट?
श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी ही संथ समजली जाते. तसेच खेळपट्टी कोरडी देखील आहे. यामुळे या ठिकाणी स्पिनर्सना मोठी मदत मिळू शकते. मधल्या काही ओव्हर्समध्ये फलंदाजांना रन्स करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. तसेच सामना सुरू झाल्यावर काही ओव्हर्स नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना थोडा स्विंग मिळू शकतो. मात्र, जसा सामना पुढे जाईल, तसे स्लोअर बॉल्स आणि कटर्स टाकणाऱ्या गोलंदाजांना यश मिळू शकते. या मैदानावर फलंदाजी करणे सुरुवातीला सोपे असले तरी कालांतराने कठीण होते. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 -185 च्या आसपास राहू शकते. स्टेडियम थोडे मोठे असल्याने षटकार मारणे इतर मैदानांच्या तुलनेत थोडे आव्हानात्मक आहे.
लखनौ सुपर जायंट्स: ऋषभ पंत (कर्णधार/यष्टिरक्षक), मिचेल मार्श, निकोलस पूरन, एडन मार्कराम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, मयंक यादव, आवेश खान, मोहसीन खान, अब्दुल समद, शाहबाज अहमद.
RR Vs LSG Pitch Report: कशी असणार एकानाची खेळपट्टी; टॉस जिंकून ‘हा’ निर्णय घेतल्यास…
राजस्थान रॉयल्स: रियान पराग (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, शिमरॉन हेटमायर, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.






