LSG vs RR Pitch Report (फोटो- ai gemini )
ऋषभ पंत अन् रियान पराग आमनेसामने
वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे लक्ष
राजस्थान विरुद्ध लखनौमध्ये सामना
Tata IPL 2026 Live LSG Vs RR Updates: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. दरम्यान आजचा देखील सामना रंगतदार असणार आहे. आयपीएल २०२६ च्या ३२ व्या सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन बलाढ्य संघ समोरासमोर येणार आहेत. लखनौच्या (IPL 2026) भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना रंगणार असून, दोन्ही संघांसाठी हा विजय महत्त्वाचा असणार आहे. या सामन्याचा पीच रिपोर्ट जाणून घेऊयात.
काय आहे आजच्या सामन्याचा पीच रिपोर्ट?
श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवरील खेळपट्टी ही संथ समजली जाते. तसेच खेळपट्टी कोरडी देखील आहे. यामुळे या ठिकाणी स्पिनर्सना मोठी मदत मिळू शकते. मधल्या काही ओव्हर्समध्ये फलंदाजांना रन्स करण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. तसेच सामना सुरू झाल्यावर काही ओव्हर्स नवीन चेंडूने वेगवान गोलंदाजांना थोडा स्विंग मिळू शकतो. मात्र, जसा सामना पुढे जाईल, तसे स्लोअर बॉल्स आणि कटर्स टाकणाऱ्या गोलंदाजांना यश मिळू शकते. या मैदानावर फलंदाजी करणे सुरुवातीला सोपे असले तरी कालांतराने कठीण होते. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 170 -185 च्या आसपास राहू शकते. स्टेडियम थोडे मोठे असल्याने षटकार मारणे इतर मैदानांच्या तुलनेत थोडे आव्हानात्मक आहे.
हवामान आणि दव फॅक्टर
लखनौमध्ये सध्या कडाक्याचा उन्हाळा आहे. तापमानाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या आसपास असल्याने खेळपट्टी अधिक कोरडी झाली आहे. रात्रीच्या वेळी दव पडण्याची शक्यता खूपच कमी आहे, त्यामुळे दुसऱ्या डावात गोलंदाजी करणाऱ्या संघाला फारशी अडचण येणार नाही.
कोणाचे पारडे जड?
राजस्थान रॉयल्सकडे रवी बिश्नोई आणि रवींद्र जडेजा सारखे दर्जेदार फिरकीपटू आहेत, तर लखनौच्या संघातही फिरकीची चांगली ताकद आहे. टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. खेळपट्टी संथ असल्याने पहिल्यांदा फलंदाजी करणे योग्य ठरेल.
SRH vs DC: कोण आहे Harsh Dubey? 20 व्या ओव्हरमध्ये 3 विकेट्स, IPL मध्ये अनोखा रेकॉर्ड
लखनौ सुपर जायंट्स: ऋषभ पंत (कर्णधार/यष्टिरक्षक), मिचेल मार्श, निकोलस पूरन, एडन मार्कराम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, मयंक यादव, आवेश खान, मोहसीन खान, अब्दुल समद, शाहबाज अहमद.
राजस्थान रॉयल्स: रियान पराग (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, शिमरॉन हेटमायर, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, सॅम करन.






