नवी दिल्ली – पाकिस्तान क्रिकेट संघाचा यष्टिरक्षक कामरान अकमलचा बोकड चोरी झाला आहे. उद्या बकरी ईद हा सण असून, बकरीदला कुर्बानी देण्यासाठी कामरानने एक लाख रुपये किमतीचा बोकड खरेदी केला होता. त्यानंतर कामरानने हा बोकड लाहोर सोसायटीत असलेल्या घरामध्ये बांधला होता. त्याची शुक्रवारी चोरी झाली आहे.
अकमलचे वडील मोहम्मद अकमल यांनी पत्रकारांना सांगितले की, यावर्षी बकरी ईदला सहा बोकडांची कुर्बानी दिली जाणार होती. मात्र, त्यातून एक बोकडाची चोरी झाली आहे. सहा बोकडपैकी चोरट्यांनी सर्वात मोठा आणि चांगला बोकड चोरला आहे. त्याची किंमत एक लाख रुपये होती. बोकड चोरीला गेल्यानंतर सोसायटीच्या सुरक्षा रक्षकाला याची माहिती देण्यात आली आहे.
अकमलचे पिता पुढे म्हणाले की, “आम्ही आमच्या नोकराला बोकडवर नजर ठेवण्यास सांगितले होते, मात्र तो रात्री तीन दरम्यान झोपी गेला. त्याचा फायदा घेत चोरट्यांनी बोकड चोरून नेले, हा सर्वात महागडा बोकड होता”