गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. बाप्पाच्या अगामानंतर घरी गौराईचे सुद्धा आगमन होते. गौरी किंवा महालक्ष्मीला सुंदर सुंदर साडी नेसून छान सजवले जाते. कोकणात मोठ्या आनंद आणि जलौषात गौरीचे आगमन केले जाते. गौरीच्या साड्यांसोबतच सुंदर आणि मराठमोळ्या दागिन्यांची निवड केली जाते. साडी आणि दागिन्यांची योग्य निवड केल्यास गौरी आणखीनच उठावदार आणि सुंदर दिसेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गौराईला सजवण्यासाठी काही मराठमोळ्या दागिन्यांबद्दल सांगणार आहोत. हे दागिने गौराईला घातल्यास मराठमोळा लुक खुलून दिसेल. (फोटो सौजन्य: Pinterest)
गौराईला सजवताना गळ्यात घाला 'हे' ठसठशीत देखणे दागिने
गौरींसाठी ठसठशीत आणि भरीव दागिन्यांची निवड करताना ३ ते ४ पदरी एकदाणी किंवा ढोलक मण्यांची माळ तुम्ही खरेदी करू शकता. मोहन माळ किंवा सोन्याच्या मोठ्या मण्यांची माळ गौराईवर अतिशय खुलून दिसेल.
पारंपरिक आणि मराठमोळा दागिने म्हणजे वज्रटीक आणि ठुशी. नऊवारी किंवा सहावारी साडी नेसवल्यानंतर गौरीला तुम्ही वज्रटीक घालू शकता. यामुळे गळा भरलेला दिसेल.
मोत्याचे दागिने कोणत्याही साडीवर अतिशय सुंदर दिसतात. चिंचपेटी, तन्मणी, मोती हार किंवा इतर मोठ्या मोत्यांचे दागिने गौराईला तुम्ही घालू शकता. यामुळे गौरीचा लुक आणखीनच रॉयल दिसेल.
पूर्वीच्या काळी सर्वच महिला गळ्यात पुतळी हार परिधान करत होत्या. बाजारात लहान किंवा मोठ्या आकाराचे पुतळी हार सहज उपलब्ध होतात. पुतळी हार घातल्यामुळे गौरी अतिशय सुंदर दिसेल.
राणी हार, लक्ष्मी हार किंवा वजनाने मोठे असेलेले दागिने गळ्यात परिधान करू शकता. गौराईचा लुक अतिशय पारंपरिक दिसण्यासाठी तुम्ही वरील मराठमोळे दागिने घालू शकता.