Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cricket News: इंग्लंडच्या ‘या’ स्टार खेळाडूचा निवृत्तीचा निर्णय; १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला पूर्णविराम

kate cross announced retirement From Cricket: इंग्लंड महिला संघाची खेळाडू केट क्रॉसने निवृत्ती जाहीर केली आहे. या इंग्लिश उन्हाळी हंगामाच्या अखेरीस ती व्यावसायिक क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 22, 2026 | 04:25 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • क्रिकेटविश्वाला धक्का
  • इंग्लंडच्या केट क्रॉसची निवृत्तीची घोषणा
  • १५ वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
इंग्लंड महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज केट क्रॉसने प्रोफेशनल  क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. केटने २१ ऑगस्टच्या संध्याकाळी निवृत्तीची घोषणा केली. केट क्रॉस गेल्या १५ वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंग्लंडचे प्रतिनिधित्व करत होती. ही ३४ वर्षीय खेळाडू २०२६ च्या हंगामाच्या अखेरीस क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होईल. इंग्लंडचे तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रतिनिधित्व करताना, तिने १०२ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून १४० विकेट्स घेतले आहेत. क्रॉसने २०१३ मध्ये इंग्लंडसाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते.

Mitchell Starc चा भेदक मारा! बांग्लादेशची ‘हवा टाईट’; ६ विकेटसह WTC मध्ये केला ‘हा’ महारिकॉर्ड

सोशल मीडियावर पोस्ट करुन दिली माहिती

केट क्रॉसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आपल्या निवृत्तीची माहिती दिली. त्यात तिने लिहिले की, ‘हा समर( उन्हाळा) माझा प्रोफेशनल क्रिकेटमधील शेवटचा हंगाम असेल. क्रिकेट माझ्या आयुष्याचा एक मोठा भाग राहिला आहे आणि याच खेळाने तिला आजची व्यक्ती म्हणून घडवले आहे. या खेळाला निरोप देणे खूप कठीण आहे. पण आता माझ्या कारकिर्दीचा शेवटचा अध्याय सुरू झाला आहे. मला व्यावसायिक स्तरावर आणि सर्वोच्च पातळीवर खेळण्याची संधी मिळाल्याबद्दल मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. पण त्याहूनही अधिक भाग्यवान मी यासाठी आहे की, या प्रवासात मला अनेक चांगली माणसे भेटली. माझ्याकडे अशा काही आठवणी आहेत ज्या आयुष्यभर माझ्यासोबत राहतील आणि ज्यांबद्दल मी सदैव कृतज्ञ राहीन.क्रिकेटमधील माझ्या या प्रवासाबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. जरी मला अजून काही सामने खेळायचे असले आणि मनात खूप काही सांगण्यासारखे असले, तरी सध्या मी त्या प्रत्येकाचे आभार मानू इच्छितो ज्यांनी मला पाठिंबा दिला आणि हे सर्व शक्य करून दाखवले.

लँकेशायरमध्ये सामील होणारी पहिली महिला खेळाडू

क्रॉसने वयाच्या १३ व्या वर्षी काउंटीच्या ज्युनियर संघात स्थान मिळवले. ती दोन वर्षांनंतर लँकेशायर अकादमीमध्ये प्रवेश घेणारी पहिली महिला खेळाडू ठरली. क्रॉसने २००५ मध्ये लँकेशायरच्या वरिष्ठ संघात पदार्पण केले. यानंतर आपल्या संपूर्ण कारकिर्दीत ती काउंटीसाठी खेळत राहिली. क्रॉसला २०११ च्या ॲशेस मालिकेसाठी इंग्लंड संघात पहिल्यांदा बोलावण्यात आले, परंतु आंतरराष्ट्रीय पदार्पणासाठी तिला २०१३ पर्यंत वाट पाहावी लागली. तिने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आणि त्याच दौऱ्यावर एकदिवसीय पदार्पणही केले, ज्यात तिने बार्बाडोसमध्ये ४/५१ अशी कामगिरी करत सामनावीर पुरस्कार पटकावला.

२०२४ मध्ये कारकिर्दीतील ४०० विकेट्स पूर्ण

२०२४ मध्ये, केट क्रॉसने प्रथम-श्रेणी, लिस्ट ए आणि टी२० क्रिकेटमध्ये मिळून कारकिर्दीतील ४०० विकेट्स पूर्ण केले. याच काळात, तिने आयसीसी एकदिवसीय गोलंदाजी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरे स्थान मिळवले. तसेच, तिने आयर्लंडविरुद्धच्या व्हाईट-बॉल मालिकेत इंग्लंड महिला संघाचे कर्णधारपदही भूषवले.

Neeraj Chopra चं जबरदस्त कमबॅक! सीझन बेस्ट थ्रोसह Lausanne Diamond League मध्ये दुसऱ्या स्थानावर

Web Title: Kate cross retirement england women cricket 15 year international career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2026 | 04:25 PM

Topics:  

  • County Championship
  • England cricket
  • Nat Sciver-Brunt
  • Retirement

संबंधित बातम्या

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…
1

Breaking: Yuzvendra Chahal चा धक्कादायक निर्णय! अचानक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा; सोशल मीडियावर पोस्ट करत म्हणाला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.