Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काव्या मारनच्या ‘सनरायझर्स’ संघात पाकिस्तान खेळाडू सामील, ऑक्शनमध्ये उधळले २.३४ कोटी रुपये

द हंड्रेड (The Hundred) लीगच्या लिलावात काव्या मारन यांच्या मालकीच्या सनरायझर्स लीड्सने पाकिस्तानी मिस्ट्री स्पिनर अबरार अहमदला २.३४ कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यामुळे आयपीएल मालकांबाबतचे तर्कवितर्क संपुष्टात आले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 12, 2026 | 08:43 PM
काव्या मारनच्या 'सनरायझर्स' संघात पाकिस्तान खेळाडू सामील (Photo Credit- X)

काव्या मारनच्या 'सनरायझर्स' संघात पाकिस्तान खेळाडू सामील (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

  • काव्या मारनच्या ‘सनरायझर्स’ संघात पाकिस्तान खेळाडू सामील
  • ऑक्शनमध्ये उधळले २.३४ कोटी रुपये
  • प्रसारमाध्यमांचा दावाही खोटा ठरला
Kavya Maran SRH Sunrisers Leeds Buys Abrar Ahmed The Hundred Auction: इंग्लंडमधील बहुचर्चित ‘द हंड्रेड’ (The Hundred) लीगच्या लिलावात यंदा पाकिस्तानी खेळाडूंबाबतच्या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. पाकिस्तानचा ‘मिस्ट्री स्पिनर’ अबरार अहमद याला अशा एका फ्रँचायझीने विकत घेतले आहे, ज्याचे थेट नाते भारताच्या आयपीएलशी (IPL) जोडलेले आहे. या एका व्यवहारामुळे केवळ लिलावातील वातावरण तापले नाही, तर आयपीएल मालक पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करणार नाहीत, हा ब्रिटीश प्रसारमाध्यमांचा दावाही खोटा ठरला आहे.

अबरार अहमदसाठी काव्या मारनच्या ‘सनरायझर्स’ची मोठी बोली

लिलावामध्ये पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद याला ‘सनरायझर्स लीड्स’ (Sunrisers Leeds) संघाने १,९०,००० पाउंड, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे २.३४ कोटी रुपयांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. विशेष म्हणजे, ही फ्रँचायझी ‘सनरायझर्स हैदराबाद’ समूहाच्या मालकीची असून, काव्या मारन या संघाच्या सह-मालकीण आहेत. या खरेदीनंतर अबरार अहमद आता इंग्लंडच्या मैदानावर सनरायझर्सच्या जर्सीत दिसणार आहे.

Abrar at Headingley, soon 👏 [Play With Fire | SunRisers Leeds] pic.twitter.com/Yqm204j091 — SunRisers Leeds (@sunrisersleeds) March 12, 2026

इंग्लिश मीडियाची ‘ती’ बातमी ठरली चुकीची

लिलावापूर्वी ‘बीबीसी’ (BBC) सह अनेक इंग्लिश माध्यमांनी असा दावा केला होता की, ज्या फ्रँचायझी मालकांकडे आयपीएलमध्ये संघ आहेत, ते पाकिस्तानी खेळाडूंना खरेदी करणे टाळतील. ‘द हंड्रेड’मधील आठपैकी चार संघ (MI लंडन, सनरायझर्स लीड्स, साउदर्न ब्रेव्ह आणि मँचेस्टर सुपर जायंट्स) आयपीएलशी संबंधित समूहांचे आहेत. या पार्श्वभूमीवर इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ECB) स्पष्टीकरणही द्यावे लागले होते. मात्र, सनरायझर्स लीड्सने अबरार अहमदला विकत घेऊन या सर्व चर्चा आणि अटकळ फेटाळून लावली आहे.

Iran-Israel-US war मुळे IPL 2026 ला निर्माण झाला धोका! आता एक मोठी अपडेट आली समोर, नक्की झाले काय? वाचा सविस्तर

उस्मान तारिक ठरला लिलावातील पहिला पाकिस्तानी खेळाडू

अबरार अहमदव्यतिरिक्त, पाकिस्तानचा आणखी एक मिस्ट्री स्पिनर उस्मान तारिक हा या लिलावात विकत घेतला जाणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू ठरला. त्याला ‘बर्मिंगहॅम फिनिक्स’ संघाने १,४०,००० पाउंड (सुमारे १.७२ कोटी रुपये) देऊन आपल्या संघात घेतले. अबरारला खरेदी करण्यासाठी ‘ट्रेंट रॉकेट्स’ आणि ‘सनरायझर्स लीड्स’ यांच्यात जोरदार चढाओढ पाहायला मिळाली, ज्यामध्ये अखेर सनरायझर्सने बाजी मारली.

शाहीन आफ्रिदीची माघार; अनेक दिग्गज राहिले ‘अनसोल्ड’

एकीकडे अबरार अहमदवर कोटींची उधळण झाली असताना, दुसरीकडे पाकिस्तानच्या अनेक बड्या स्टार खेळाडूंना या लिलावात कोणीही खरेदीदार मिळाला नाही. यामध्ये वेगवान गोलंदाज हारिस रौफ, अष्टपैलू शादाब खान आणि युवा फलंदाज सैम अयुब यांचा समावेश आहे. दरम्यान, पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी याने लिलाव सुरू होण्यापूर्वीच स्वतःचे नाव मागे घेतले होते, ज्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

IPL 2026 Schedule: प्रतीक्षा संपली! आयपीएलच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे वेळापत्रक जाहीर; पहिल्या सामन्याचा मान कोणाला?

Web Title: Kavya maran sunrisers leeds buys pakistani spinner abrar ahmed the hundred auction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 08:43 PM

Topics:  

  • Abrar Ahmed
  • cricket news
  • Kavya Maran
  • The Hundred 2026

संबंधित बातम्या

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…
1

Sportsfield Monsoon League: आर्यष तिवारीच्या घातक गोलंदाजीसमोर फॅन्टम क्लब ढेपाळला; स्पार्क स्पोर्टीव्हचा…

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना
2

WCL 2026 चे शेड्यूल जाहीर! भारत-पाकिस्तान महामुकाबल्याची तारीख ठरली; ‘या’ दिवशी रंगणार हाय-व्होल्टेज सामना

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास
3

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास

याला म्हणतात थरार! चित्तरंजनने ठोकल्या 52 मध्ये 145 रन्स; स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ संघाचा विजय
4

याला म्हणतात थरार! चित्तरंजनने ठोकल्या 52 मध्ये 145 रन्स; स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ संघाचा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.