चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला मोठा फटका (फोटो- ians)
खलील अहमद आयपीएलमधून आउट
चेन्नई सुपर किंग्जला मोठा धक्का
दुखापतीमुळे सोडावी लागली स्पर्धा
Chennai Super Kings: आयपीएलचा महासंग्राम सुरू झाला आहे. आज आयपीएलचा 24 वा सामना होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाने सलग 2 सामने जिंकून गुणतालिकेत आघाडी घेतली आहे. पहिले तीन सामने चेन्नईने गमावले होते. त्यानंतर चेन्नईच्या संघाला सूर गवसला आहे. मात्र आता संघासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे. चेन्नईचा प्रमुख गोलंदाज खलील अहमद हा खेळाडू पूर्ण स्पर्धेतून आउट झाला आहे. त्याबाबत माहिती जाणून घेऊयात.
खलील अहमद हा आयपीएलच्या पूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्याला दुखापत झाल्यामुळे यापुढील तो सामने चेन्नईकडून खेळू शकणार नाहीये. त्यामुळे त्याला या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. चेन्नई सुपर किंग्जच्या संघाला सूर गवसलेला असतानाच प्रमुख वेगवान गोलंदाज खलील अहमद स्पर्धेतून बाहेर पडल्याचे चेन्नईच्या अडचणी वाढल्या आहेत.
CSK Vs KKR: ‘केकेआरचा’ पराभवाचा ‘पंच’; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली शेवटच्या स्थानावर आघाडी
चेन्नई सुपर किंग्जमध्ये खलील अहमदच्या जागी कोणता खेळाडू येणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 28 वर्षीय चेतन सकारिया या खेळाडूचे नाव देखील चर्चेत आहे. अंतर्गत क्रिकेट स्पर्धेत त्याने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे तो आयपीएलमध्ये प्रवेश करण्यास तयार असल्याचे म्हटले जात आहे.
तर आकाश मधवाल हे आणखी एक नाव चर्चेत आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना त्याने चांगली कामगिरी केली होती. मात्र खलील अहमदच्या जागी आकाश मधवाल खेळणार का हे पहावे लागणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज आतापर्यंत 5 सामने खेळला आहे. त्यापैकी चेन्नईने 2 सामने जिंकले आहेत. या 5 ही सामन्यांचा खलील अहमद हिस्सा होता. मात्र आता दुखापतग्रस्त झाल्यामुळे तो आता आयपीएल स्पर्धेत खेळू शकणार नाहीये.
सीएसकेचा केकेआर पराभव
चेन्नईच्या एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध कोलकाता नात रायडर्स यांच्यात सामना पार पडला. केकेआरने टॉस जिंकून प्रथम (IPL) गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 192 रन्स केल्या आणि केकेआरला 193 रन्सचे टार्गेट दिले होते. दरम्यान या सामन्यात सीएसकेने केकेआरचा 32 रन्सने पराभव केला आहे.
CSK Vs KKR Live: ‘केकेआर’चा गोलंदाजीचा निर्णय; चेन्नईच्या अडचणी वाढणार; कारण…
प्रथम फलंदाजी करताना, चेन्नई सुपर किंग्सने आपल्या निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून एकूण 192 धावा उभारल्या. संघासाठी संजू सॅमसनने एक उत्कृष्ट खेळी साकारली; त्याने 32 चेंडूंत 4 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 48 धावा केल्या. दुसरीकडे, कोलकातासाठी कार्तिक त्यागी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला, ज्याने 2 बळी मिळवले. एक विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे, चेन्नईला आपल्या धडाकेबाज सुरुवातीला साजेसी अशी मोठी धावसंख्या उभारता आली नाही.






