Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Khelo India Para Games: महाराष्ट्राच्या सुकांत, प्रेमची उपांत्यपूर्व फेरीत धडक; आजपासून रंगणार अ‍ॅथलेटिक्सचा थरार

एस एल 4 गटात सांगलीचा सुकांत कदमने  महाराष्ट्राच्याच निलेश गायकवाडचा 21-10, 21-19 गेमने पराभव केला. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असणार्‍या सुकांतने पहिला सेट सहजपणे जिंकून लढतीवर पकड घेतला होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 20, 2025 | 06:39 PM
Khelo India Para Games: महाराष्ट्राच्या सुकांत, प्रेमची उपांत्यपूर्व फेरीत धडक; आजपासून रंगणार अ‍ॅथलेटिक्सचा थरार
Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली:  महाराष्ट्राच्या सुकांत कदम, प्रेम अले यांनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी देत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली आहे. दुसर्‍या पर्वाचे आज स्पर्धेचे शानदार उद्घाटन केेंद्रिय क्रीडामंत्री मनसुख मंडविया यांच्या हस्ते झाले.  नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी क्रीडा संकुलातील जिम्नॉस्टिक्स हॉलमध्ये सुरू असलेल्या पॅरा बॅडमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सकाळपासूनच दमदार कामगिरीचे प्रदर्शन घडविले.

एस एल 4 गटात सांगलीचा सुकांत कदमने  महाराष्ट्राच्याच निलेश गायकवाडचा 21-10, 21-19 गेमने पराभव केला. जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असणार्‍या सुकांतने पहिला सेट सहजपणे जिंकून लढतीवर पकड घेतला होती. दुसर्‍या सेटमध्ये त्याना संघर्ष करावा लागला. अनुभवी सुकांतने आघाडी कायम राखत विजयी सलामी दिली. पॅरीस ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणार्‍या सुकांत प्रथमच खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत सहभागी झाला आहे.  पुण्यात प्रशिक्षक निखिल कानेटकर, मयंक गोळे यांच्या मार्गदर्शनाव्दारे सराव करणार्‍या सुकांत स्पर्धेतील सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार आहे. शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत सुकांतची लढत छत्तीसगडच्या अभिजीत सकुजा विरूध्द रंगणार आहे.

विलचेअरच्या डब्ल्यू एच 1 गटात महाराष्ट्राच्या प्रेमकुमार अले यांनी उत्तरप्रदेशच्या सिराजउद्दीनवर सहज मात केली. 21-12, 21-14 गेमने प्रेमकुमार अले पहिली फेरी जिंकून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला. सेनादलातून निवृत्त झाल्यानंतर पॅरा बॅडमिंटन खेळण्याचा श्रीगणेशा पुण्यातून केला.आंतरराष्ट्रीय स्तरावर 10 सुवर्णपदकांचा कामगिरी करणारे प्रेमकुमार प्रथमच खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

शुक्रवार 21 मार्चपासून अ‍ॅथलेटिक्सचा थरार रंगणार आहे. ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारी दुखापतग्रस्त असल्याने दुसर्‍या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. गतस्पर्धेत खिलारीने सुवर्णपदक जिंकले होते. यंदा संदिप सलगर, भाग्यश्री जाधव,  दिलीप गावीत या पॅरीस ऑलिम्पिकपटूं अ‍ॅथलेटिक्सचे मैदान गाजविताना दिसतील.

Khelo India Para Games : मराठमोळे ऑलिम्पिकपटू गाजविणार दिल्लीेचे मैदान; खेलो इंडिया पॅरा स्पर्धेसाठी महाराष्ट्र सज्ज..

सलग दुसर्‍यांदा राजधानी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा स्पर्धेचा बिगुल गुरूवार 20 मार्च रोजी वाजणार असून महाराष्ट्र स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. मराठमोळे पॅरीस पॅरा ऑलिम्पिकपटू सुकांत कदम, संदिप सलगर, स्वरूप उन्हाळकर, दिलीप गावीत भाग्यश्री जाधव हे दिल्लीतील स्पर्धेत सुवर्ण पदकांचे दावेदार आहेत.दुसरी खेलो इंडिया पॅरा स्पर्धा 20 ते 27 मार्च दरम्यान दिल्लीत 3 क्रीडा संकुलात रंगणार आहे. आर्चरी, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी व टेबलटेनिस या 6 क्रीडाप्रकारात देशभरातील 1300 क्रीडापटू सहभागी झाले आहेत. स्पर्धेसाठी जवाहरलाल नेहरू स्टेडियम, इंदिरा गांधी स्टेडियम व डॉ. कर्णी सिंग शूटींग रेंज सज्ज झाली आहे.

Web Title: Khelo india tournament prem will enter the quarterfinals para competition sports marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2025 | 06:39 PM

Topics:  

  • Khelo India tournament
  • New Delhi
  • Sports News

संबंधित बातम्या

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा
1

घे उत्तुंग भरारी! पुण्याच्या शर्वरी मानेची National Football संघात निवड; उझबेकिस्तानमध्ये होणार स्पर्धा

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय
2

श्रृती गितेची धडाकेबाज फिफ्टी, कल्याणी कुटेची भेदक गोलंदाजी; रॉयल स्ट्रायकर्स शि वॉरियर्सचा दणदणीत विजय

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक
3

पुण्यात खेळाडूंचा बोलबाला! अवघ्या २५ मिनिटांत सामना जिंकला; प्रणव मंजुनाथची सेमीफायनलमध्ये धडक

National Sports Day: ‘खेल की बात, पीएम के साथ’! राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त वाशिममध्ये तरुणांशी ‘खेलो इंडिया संवाद’
4

National Sports Day: ‘खेल की बात, पीएम के साथ’! राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त वाशिममध्ये तरुणांशी ‘खेलो इंडिया संवाद’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.