Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अबब! KKR चा पराभव ‘त्या’ 21 चेंडूंमुळे; IPL मध्ये Andre Russell नसल्याने….; चर्चेला उधाण

कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 220 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 221 धावांची गरज होती. मात्र कोलकाताच्या संघाने सुरुवातीला जो वेग पकडला होता तो डेथ ओव्हर्समध्ये पाहायला मिळला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 30, 2026 | 04:00 PM
अबब! KKR चा पराभव ‘त्या’ 21 चेंडूंमुळे; IPL मध्ये Andre Russell नसल्याने….; चर्चेला उधाण
Follow Us
Close
Follow Us:

मुंबईने केकेआरवर 6 विकेट्सने मिळवला विजय 
रोहित शर्माचे वानखेडेवर वादळी अर्धशतक 
आंद्रे रसेल नसल्याने केकेआरच्या पराभवाची चर्चा

Tata IPL MI vs KKR: काल मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (MI vs KKR) यांच्यात सामना पार पडला. आयपीएलच्या या सामन्यात अक्षरश: धावांची खैरात पाहायला मिळाली. केकेआरने दिलेले 221 धावांचे लक्ष्य मुंबईच्या संघाने सहज पूर्ण केले. रोहित शर्मा, रिकल्टनने केलेल्या अर्धशतकी खेळीने मुंबईचा विजय झाला. मात्र केकेआरचा विजय आंद्रे रसेल नसल्यामुळे झाला अशी चर्चा आता चाहत्यांमध्ये रंगू लागली आहे.

कोलकाताच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना 220 धावा केल्या. मुंबईला विजयासाठी 221 धावांची गरज होती. मात्र कोलकाताच्या संघाने सुरुवातीला जो वेग पकडला होता तो डेथ ओव्हर्समध्ये पाहायला मिळला नाही. शेवटच्या 21 चेंडूत एकही षटकार केकेआरचे फलंदाज मारू शकले नाहीत, त्यामुळे त्यांची अपेक्षित धावसंख्या 240 ते 250 ऐवजी 220 वर थांबली.

शेवटच्या 21 चेंडूत अतिरिक्त धावा न झाल्यानेच मुंबईचा विजय झाला असे म्हटले जात आहे. त्यामुळे केकेआरला नक्कीच आंद्रे रसेलची आठवण आली असणारच. शेवटच्या टप्प्यात संघाला चांगली धावसंख्या उभारून देण्याची जबाबदारी फिनिशर्सकडे असते. मात्र रिंकू सिंग आणि रमनदीप सिंह यांनी आक्रमक खेळी न केल्याने केकेआरला मोठी धावसंख्या करता आली नाही. रनरेट कमी पडल्याने धावसंख्या 220 धावांवर अडकली.

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

आंद्रे रसेलने केकेआर संघातून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे यंदा तो संघात खेळण्यासाठी उपलब्ध नाहीये. तो संघाचा कोच म्हणून कार्यरत आहे. दरम्यान केकेआरच्या संघात आंद्रे रसेल असतं तर काल संघाला मोठी धावसंख्या शेवटच्या टप्प्यात करता आली असती आणि विजय देखील मिळवता आला असता अशी चर्चा सध्या सोशल मिडियावर सुरू झाल्याचे दिसून येत आहे.

MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’

अखेर तब्बल 14 वर्षांची आपली परंपरा मुंबई इंडियन्सने मोडीत काढली आहे. 14 वर्षांनी मुंबई इंडियन्सने आपला लीग मधला पहिला सामना जिंकला आहे. हिटमॅन रोहित शर्माने 78 धावांची तडाखेबंद खेळी केली. मुंबई इंडियन्सने केकेआरवर विकेट्सने विजय मिळवला आहे. तसेच पहिला सामना जिंकत 14 वर्षांची परंपरा देखील मोडीत काढली आहे.

बदाम हलव्यासारखं ठोकलं! अवघ्या 22 चेंडूत Rohit Sharma चा वानखेडेवर धुमाकूळ, KKR ला धुतले

मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 78 धावांची तडाखेबंद खेळी केली. तर रिकल्टनने 80 धावांची महत्वाची खेळी केली. सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर चौकार मारून आपला इरादे स्पष्ट केले. 8 चेंडूत 16 धावा करून सूर्यकुमार यादव बाद झाला. तिलक वर्माने देखील संघाच्या विजयासाठी महत्वचे योगदान दिले. हार्दिक पंड्याने शेवटपर्यंत मैदानात राहून संघाला विजयापर्यंत पोहोचवले.

 

Web Title: Kkr rinku singh and ramandeep sinh do not play 1 siz in last 21 balls andre russell against mi ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 03:57 PM

Topics:  

  • Andre Russell
  • IPL 2026
  • KKR vs MI
  • Rohit Sharma

संबंधित बातम्या

IPL 2026: LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक? समोर आली मोठी अपडेट
1

IPL 2026: LSG विरुद्धच्या सामन्यात धोनी करणार कमबॅक? समोर आली मोठी अपडेट

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’
2

IPL 2026 Points Table: गुजरातच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठी उलथापालथ! दोन संघांना फटका तर ‘हा’ संघ पहिल्या स्थानी ‘विराजमान’

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ
3

GT Vs SRH: हा तर फुसका बार! Rabada चा कहर अन् सनरायझर्स गारद; पॉईंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट
4

GT Vs SRH Live: वॉशिंग्टनची गुजरातसाठी ‘सुंदर’ खेळी; सनरायझर्सला ‘तब्बल’ इतक्या रन्सचे टार्गेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.