Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KL Rahul ने IPL मध्ये रचला इतिहास! क्रिकेटच्या ‘किंग’लाही टाकले मागे, असा करणारा ठरला पहिलाच फलंदाज

काल ४० वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात दिल्लीने ८ धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात केएल राहुलने ५७ धावांची खेळी करून इतिहास रचला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 23, 2025 | 02:07 PM
KL Rahul creates history in IPL! He even surpassed the 'King' of cricket, becoming the first batsman to do so

KL Rahul creates history in IPL! He even surpassed the 'King' of cricket, becoming the first batsman to do so

Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 : आयपीएल २०२५ चा 18 वा हंगामात चांगलाच बहरात आला आहे. आतापर्यंत ४०  सामने खेळवण्यात आले आहेत. काल ४० वा सामना लखनौ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने एलएसजीचा  ८ विकेट्सने पराभव केला. या विजयासह भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि विकेटकीपर केएल राहुलने आयपीएलमध्ये विशेष कामगिरी केली. केएल राहुल आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद ५००० धावा एकमेव खेळाडू बनला आहे. त्याने त्याच्या माजी संघ असलेल्या  लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध हा पराक्रम करून दाखवला आहे.

केएल राहुलला ५००० धावा पूर्ण करण्यासाठी ५१ धावांची आवश्यकता होती. अशावेळी बंगळुरूच्या या ३२ वर्षीय  फलंदाजाने लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध ५७ धावांची शानदार खेळी साकारली आणि  आयपीएलमध्ये इतिहास रचला.

हेही वाचा : रिषभ पंत आणि जहीर खानमध्ये चालू सामन्यात बाचाबाची, LSG डगआउटमधील व्हिडिओने उडवली खळबळ

गेल्या वर्षी आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात १४ कोटी रुपयांना डीसीने राहुलला सामील करून घेतले होते. त्याने १३९ व्या आयपीएल सामन्याच्या १३० व्या डावात ५००० धावांचा टप्पा पार केला.  त्याने माजी ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा विक्रम मोडीत काढला आहे.  आयपीएलमध्ये खेळताना वॉर्नरने १३५ व्या डावात ५००० धावांचा डोंगर सर केला होता.

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो ८ वा खेळाडू

मंगळवारी एलएसजीविरुद्धच्या त्याच्या खेळीदरम्यान, केएल राहुलने रॉबिन उथप्पा (४९५२) आणि ख्रिस गेल (४९६५) यांना मागे टाकत आयपीएलच्या इतिहासात आठवा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. विराट कोहली हा २६० सामन्यांमध्ये ८३२६ धावांसह आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याच्यानंतर रोहित शर्मा, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर, सुरेश रैना, एमएस धोनी आणि एबी डिव्हिलियर्स यांचा क्रमांक लागतो.

हेही वाचा : IPL 2025 : आधीच जखमी, तरी Prasidhhi Krishna चे दमदार पुनरागमन, विरोधी संघाला एकामागून एक देतोय डंख..

आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

  1. विराट कोहली (आरसीबी) – ८३२६
  2. रोहित शर्मा (एचडीसी/एमआय) – ६७८६
  3. शिखर धवन (डीसी/एमआय/एचडीसी/एसआरएच/पीबीकेएस) – ६७६९
  4. डेव्हिड वॉर्नर (डीसी/एसआरएच) – ६५६५
  5. सुरेश रैना (सीएसके/जीएल) – ५५२८
  6. एमएस धोनी (सीएसके/आरपीएसजी) – ५३७७
  7. एबी डिव्हिलियर्स (डीसी/आरसीबी) – ५१६२
  8. केएल राहुल (आरसीबी/एसआरएच/पीबीकेएस/एलएसजी/डीसी) – ५००६*ख्रिस गेल (केकेआर/आरसीबी/पीबीकेएस) – ४९६५
  9. रॉबिन उथप्पा (सीएसके/केकेआर/एमआय/पीडब्ल्यूआय/आरसीबी/आरआर) – ४९५२

केएल राहुलची आयपीएलमधील कामगिरी

केएल राहुलने २०१३ च्या हंगामात आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. गेल्या १२ वर्षांत तो पाच वेगवेगळ्या संघांकडून खेळला आहे. त्याने पंजाब किंग्जसाठी सर्वाधिक धावा देखील केल्या आहेत. केएल राहुलने पंजाब किंग्जकडून खेळताना २५४८ धावा केल्या आहेत. केएल राहुल २०१८ ते २०२१ या काळात पंजाब किंग्जचा भाग होता. त्यानंतर तो लखनऊ सुपर जायंट्समध्ये सामील झाला. २०२२ ते २०२४ पर्यंत त्याने लखनऊ संघाची धुरा वाहिली.

 

Web Title: Kl rahul created history in ipl he became the first batsman to do so

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2025 | 02:07 PM

Topics:  

  • IPL 2025
  • IPL records
  • KL Rahul Captain
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs SA 1st Test : KL Rahul ने गाठला मोठा टप्पा! भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा केल्या पूर्ण 
1

IND vs SA 1st Test : KL Rahul ने गाठला मोठा टप्पा! भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये 4000 धावा केल्या पूर्ण 

IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा 
2

IND vs SA 1st Test : पहिला दिवस भारतीय गोलंदाजांच्या नावे! दिवसाअखेर गिल आर्मीचा स्कोअर 1 बाद 37 धावा 

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
3

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
4

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.