फोटो सौजन्य - JioHotstar
रिषभ पंत आणि जहीर खान यांच्यात भांडण : लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या स्पर्धेमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने लखनौला दुसऱ्यांदा पराभूत केले. कालच्या सामन्यामध्ये रिषभ पंतच्या संघाची निराशाजनक कामगिरी राहिली. फलंदाजांनी त्याचबरोबर गोलंदाजांनी देखील काल खराब कामगिरी केली त्यामुळे संघाला कालच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. कालच्या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सच्या १५९ धावांच्या प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक सुरुवात केली. युवा अभिषेक पोरेल (५१) ने करुण नायर (१५) सोबत ३.४ षटकांत पहिल्या विकेटसाठी ३६ धावांची भागीदारी केली.
LSG vs DC सामन्यानंतर लखनौच्या मालकाशी KL Rahul ने घेतला बदला! संजीव गोयंका आयुष्यभर नाही विसरणार, Video Viral
नायर बाद झाल्यानंतर, राहुलने संघाची सूत्रे हाती घेतली आणि शानदार खेळी करत त्याच्या माजी संघाच्या जबड्यातून विजय हिसकावून घेतला. दिल्लीने लखनौचा ८ गडी राखून पराभव करून चालू सीझनमध्ये आपला सहावा विजय नोंदवला. या सामन्यातील पराभवानंतर ट्रोलर्सनी लखनौचा कर्णधार ऋषभ पंतवर निशाणा साधला. दरम्यान, सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये पंत ७ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यापूर्वी डगआउटमध्ये मार्गदर्शक झहीर खानशी वाद घालताना दिसत आहे.
So they wantedly stopped him 👀?#RishabhPant #LSGvsDC pic.twitter.com/iNuiXCkP8q
— Jagannadh Nsk❤️🔥🌞 (@Jagannadhnsk24) April 22, 2025
खरंतर, आयपीएल २०२५ च्या ४० व्या सामन्यात लखनौने दिल्लीला १६० धावांचे लक्ष्य दिले होते . एडेन मार्कराम आणि मिचेल मार्श यांनी लखनौला चांगली सुरुवात करून दिली. लखनौ संघाने पहिल्या १० षटकांत एक विकेट गमावल्यानंतर ८७ धावा केल्या आणि शेवटच्या १० षटकांत ५ विकेट गमावल्यानंतर त्यांना फक्त ७२ धावा करता आल्या.
embarassing from pant 🤢 https://t.co/pSTn3lkScf pic.twitter.com/snbPkwAIwl
— sᴜɢᴀʀ (@Sugar_Sai_Gill) April 22, 2025
लखनौचा कर्णधार ऋषभ पंतचा फॉर्म इतका खराब आहे की कर्णधार असूनही, मार्गदर्शक झहीर खानने त्याच्यापुढे प्रभावशाली खेळाडू आयुष बदोनीला मैदानात उतरवले. आयुषने २१ चेंडूत ३६ धावा केल्या. जेव्हा आयुष बाद झाला तेव्हा पंतला फक्त दोन चेंडू खेळायचे होते, कर्णधार त्यावर एकही धाव करू शकला नाही आणि तोच जुना शॉट खेळून खाते न उघडता बाद झाला. आता त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो एलएसजी डगआउटमध्ये मार्गदर्शक झहीर खानशी वाद घालताना दिसत आहे. पंतच्या या व्हिडिओवरून हे स्पष्ट होते की त्याला उशिरा फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयावर तो रागावला होता.