
फोटो सौजन्य - Delhi Capitals
KL Rahul T-२० मधील कामगिरी : आज सनरायझर्स हैदराबादचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होणार आहे. हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर झाला आहे. पण दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहे. आज सर्वांच्या नजारा दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांकडे असणार आहेत. त्यामुळे आजच्या संघात खेळाडू कशी कामगिरी करतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. मागील दोन सामन्यात दिल्लीच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता त्यामुळे आज संघ कशी कामगिरी करेल यावर चाहत्यांची नजर टिकून आहे. आयपीएल २०२५ मध्ये केएल राहुल उत्तम लयीत दिसत आहे. राहुलने आतापर्यंत खेळलेल्या सामन्यांमध्ये अद्भुत कामगिरी केली आहे. तो दिल्ली कॅपिटल्सच्या वतीने सहभागी होत आहे.
५ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सचा संघ त्यांचा आगामी सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध खेळेल. या सामन्यात केएल राहुलला इतिहास रचण्याची संधी असेल. तो विराट कोहलीचा विक्रम मोडू शकतो. राहुल सर्वात जलद ८००० टी२० धावा करणारा भारतीय फलंदाज बनण्यापासून फक्त ४३ धावा दूर आहे. केएल राहुलने आतापर्यंत आयपीएलमध्ये १३२ डावांमध्ये ५०५४ धावा केल्या आहेत. तो आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळत आहे, परंतु आतापर्यंत तो आयपीएलमध्ये पाच वेगवेगळ्या संघांकडून आयपीएल खेळला आहे. दिल्लीपूर्वी तो लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादकडून खेळला आहे. त्याने पंजाब आणि एलएसजीचेही नेतृत्व देखील केले आहे.
𝐓𝐡𝐢𝐫𝐝 𝐜𝐨𝐧𝐬𝐞𝐜𝐮𝐭𝐢𝐯𝐞 𝐈𝐏𝐋 𝐬𝐞𝐚𝐬𝐨𝐧 𝐰𝐢𝐭𝐡 𝟓𝟎𝟎+ 𝐫𝐮𝐧𝐬 𝐟𝐨𝐫 𝐊𝐢𝐧𝐠 𝐊𝐨𝐡𝐥𝐢! 👑🔥 David Warner leads the chart with six 500+ run seasons (despite missing one year), followed by KL Rahul with five such seasons 🤝#IPL2025 #DavidWarner #ViratKohli… pic.twitter.com/0VWruF3APY — Sportskeeda (@Sportskeeda) May 5, 2025
आता केएल राहुल टी-२० क्रिकेटमध्ये आणखी एक मोठा विक्रम करण्याच्या जवळ आहे. टी-२० क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय सामने, आयपीएल आणि देशांतर्गत टी-२० सामन्यांमधील धावा समाविष्ट आहेत. राहुलने आतापर्यंत २२२ टी-२० डावांमध्ये ७९५७ धावा केल्या आहेत. म्हणजे आठ हजार धावा पूर्ण करण्यासाठी त्याला फक्त ४३ धावा करायच्या आहेत, ज्या तो आज म्हणजे सोमवारी करू शकतो.
क्रिकेटपटू मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी चौकशी सुरू केली
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद ८००० धावा करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने फक्त २१३ डावांमध्ये हा आकडा गाठला. दुसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानचा बाबर आझम आहे, ज्याने २१८ डावांमध्ये आठ हजार धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, ज्याने २४३ डावांमध्ये हा विक्रम केला आहे. आज केएल राहुल त्याचा २२२ वा सामना खेळणार आहे त्यामुळे आजच्या त्याच्या कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांची नजर असणार आहे.