फोटो सौजन्य - SunRisers Hyderabad
मोहम्मद शमी : सध्या इंडियन प्रिमियर लिगचा हा 18 वा सिझन शेवटच्या टप्यात आहे, आज या स्पर्धेचा 55 वा सामना रंगणार आहे. भारताचा क्रिकेटपटू मोहम्मद शमीचे चॅम्पियन ट्रॅाफीमध्ये पुनरागमन झाले, याआधी तो बराच काळ संघाबाहेर होता. 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकमध्ये त्याला दुखापत झाली होती, त्यानंतर तो सर्जरीसाठी बाहेर देशामध्ये गेला होता. सध्या तो आयपीएल 2025 मध्ये सनराइझर्स हैदराबादच्या संघामधून खेळत आहे. हैदराबादच्या संघाने या सिझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे, याचदरम्यान मोहम्मद शमीसंदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद शमीला धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे. सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात यासंदर्भात चर्चा सुरु आहे. रविवारी संध्याकाळी राजपूत सिंधर नावाच्या एका तरुणाने मोहम्मद शमीच्या मेल आयडीवर एक ईमेल पाठवला ज्यामध्ये त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. मोहम्मद शमी सध्या सनरायझर्स हैदराबाद संघात आहे आणि आयपीएल खेळत आहे. मोहम्मद शमीला धमकीसंदर्भात शमीने कोणत्याही प्रकारची माहिती अजुनपर्यत दिली नाही. त्यामुळे याबातमीत किती तथ्य आहे हे मोहम्मद शमी स्वत: उघडपणे बोलल्यावरचं त्याचा खुलासा होईल.
🚨 SHOCKING: Cricketer Mohammed Shami receives death threats via email! UP’s Amroha Police have filed an FIR. 🏏⚖️ Spread the word to demand justice! #MohammedShami #CricketNews #sportnews pic.twitter.com/g3ipZ5N3Nv — NewsDaily🪖🚨🪖 (@XNews24_7) May 5, 2025
सुत्रांच्या माहितीनुसार धमकीचा मेल जेव्हा आला होता तेव्हा त्याने लगेचच त्याचा मोठा भाऊ हसीब अहमदला यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर सोमवारी म्हणजेच आज मोहम्मद हसीब यांनी एसपी अमित कुमार आनंद यांची भेट घेतली आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणात सायबर पोलिस स्टेशनने एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
Prabhsimran Singh चे वडील लढत आहेत जीवन आणि मृत्यूची लढाई! पॅशनपाहून जगाने केला सलाम
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी नेहमीच त्यांच्या वैयत्तिक आयुष्यामुळे त्याचबरोबर त्यांच्या खेळीमुळे चर्चेत राहिला आहे. त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर अनेक आरोप लावले होते त्यामुळे तो मोठ्या प्रमाणात चर्चेत होता. चॅम्पियन ट्रॉफीमध्ये मोहमद शमी भारतासाठी खेळत होता. यावेळी रमजान महिन्यामध्ये तो एनर्जी ड्रिंक पिताना दिसला यावेळी सोशल मीडियावर मोठा गोंधळ उडाला होता. यावेळी त्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल देखील केले होते तर काही समर्थकांनी त्याला सपोर्टही केला होता. आता धमकीच्या या मेलनंतर पुढे होईल पोलीस काय ऍक्शन घेतील यासंदर्भात तुम्हाला वेळोवेळी माहिती देऊ.