Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB Vs PBKS : कोहली आणि पडिक्कल यांची दमदार अर्धशतके, आरसीबीकडून पंजाब किंग्जचा सात विकेट्सने पराभव.. 

आयपीएल २०२५ मधील ३७ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सचा ७ विकेट्सने पराभव केला. गोलंदाजांच्या शानदार कामगिरीमुळे तसेच विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आरसीबीने हा विजय मिळवला.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 21, 2025 | 07:24 AM
RCB Vs PBKS: Kohli and Padikkal hit strong half-centuries, RCB defeated Punjab Kings by seven wickets.

RCB Vs PBKS: Kohli and Padikkal hit strong half-centuries, RCB defeated Punjab Kings by seven wickets.

Follow Us
Follow Us:

RCB Vs PBKS :  कृणाल पंड्या आणि सुयश शर्मा यांच्या शानदार गोलंदाजीनंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या अर्धशतकांमुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने रविवारी इंडियन प्रीमियर लीगमध्ये एकतर्फी सामन्यात पंजाब किंग्जवर सात विकेट्सने मात केली. पंजाबच्या १५८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने विराट कोहली (नाबाद ७३) आणि देवदत्त पडिक्कल (६१ धावा) यांच्या दुसऱ्या विकेटसाठी १०३ धावांच्या भागीदारीच्या जोरावर सात चेंडू शिल्लक असताना तीन विकेटच्या मोबदल्यात १५९ धावा करून सहज विजय मिळवला. या विजयासह, आरसीबीने पंजाब किंग्जसह पाच संघांमध्ये सामील झाले ज्यांनी आतापर्यंत सर्वाधिक गुण मिळवले आहेत. पंजाब किग्जने यापूर्वी सहा विकेटच्या मोबदल्यात १५७ धावा केल्या होत्या.

डावखुरा फिरकी गोलंदाज कृणाल (२/२५) आणि लेग स्पिनर सुयश (२/२६) यांच्या फिरकी गोलंदाजीमुळे पंजाबने नियमित अंतराने विकेट गमावल्या आणि त्यांच्या कोणत्याही फलंदाजाला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या डावात रूपांतर करता आले नाही. पंजाबकडून सलामीवीर प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक ३३ धावा केल्या तर शशांक सिंगने ३१ धावा करून नाबाद राहिला. जोश इंग्लिस (२९), मार्को जॅन्सन (नाबाद २५) आणि प्रियांश आर्य (२२) यांनीही उपयुक्त खेळी केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना, आरसीबीने डावाच्या पहिल्याच षटकात फिल साल्ट (०१) चा बळी गमावला. तो अर्शदीपच्या गोलंदाजीवर

हेही वाचा : IPL 2025: गुजरात टायटन्स संघाला मोठा धक्का; शुभमन गिलला १२ लाखांचा दंड

यष्टीरक्षक इंग्लिसने झेलबाद केला. त्यानंतर पॉवर प्लेमध्ये सलामीवीर कोहली आणि पडिक्कल यांनी संघाची धावसंख्या १ बाद ५४ पर्यंत नेली. कोहलीने झेवियर बार्टलेटच्या चेंडूवर चौकार मारला तर पडिक्कलने वेगवान गोलंदाजाच्या चेंडूवर षटकार मारला. कोहलीने हरप्रीत ब्रारचे दोन चौकारांसह स्वागत केले आणि त्यानंतर जानसेनच्या पहिल्याच षटकातही दोन चौकार मारले. पडिक्कलने आक्रमक वृत्ती दाखवली आणि युजवेंद्र चहल आणि बार्टलेटवर षटकार मारले. त्याने चहलच्या चेंडूवर धाव घेऊन ३० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

तथापि, पुढच्याच षटकात, हरप्रीतच्या चेंडूवर मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना पडिकल लौंग ऑन बाउंड्रीवर निहाल वधेराने झेल दिला. कोहलीने ४३ चेंडूत जॅन्सेनच्या चेंडूवर धाव घेऊन आपले अर्धशतक पूर्ण केले. आरसीबीला शेवटच्या तीन षटकांत १४ धावांची आवश्यकता होती आणि जितेश शर्माने (नाबाद ११) वधेराच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.

हेही वाचा : PSL मध्ये पठ्ठ्याचं मन रमेना; सामन्यादरम्यान मोबाईलवर पाहू लागला आयपीएल, VIDEO तुफान व्हायरल

बंगळुरुचा गोलंदाजीचा निर्णय ठरला यशस्वी

तत्पूर्वी, पाटीदार संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रभसिमरन आणि प्रियांश यांनी पंजाबला वेगवान सुरुवात करून दिली. प्रभसिमरनने यश दयालचे चौकार मारून स्वागत केले तर प्रियांशने त्याच षटकात एक षटकार आणि एक चौकार मारला. प्रभसिमरनने भुवनेश्वरवर तीन चौकारही मारले. प्रियांशने जोश हेझलवूडच्या चेंडूवर दोन चौकार मारले पण कृणालच्या चेंडूवर जोरात मारण्याचा प्रयत्न करताना त्याने चेंडू हवेत फेकला आणि टिम डेव्हिडने त्याचा सोपा झेल घेतला. पॉवर प्लेमध्ये प्रभसिमरनने हेझलवूडच्या चेंडूवर षटकार मारून संघाला १ बाद ६२ धावांपर्यंत पोहोचवले. पण नंतर १५७ धावाच हा संघ करु शकला, पंजाबला शेवटच्या पाच षटकांत फक्त ३८ धावा करता आल्या.

 

Web Title: Kohli and padikkal hit half centuries punjab kings lost to rcb rcb vs pbks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 07:24 AM

Topics:  

  • IPL 2025
  • RCB Vs PBKS
  • Shreyas Iyer
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?
1

IND vs AFG: भारत-अफगाणिस्तान मालिकेआधी मोठी अपडेट! T20 च्या वेळापत्रकात बदल? कधी अन् कुठे पाहता येणार सामने?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.