फोटो सौजन्य - सोशल मीडिया
Legend 90 लीग : जगभरामध्ये क्रिकेटची प्रचंड क्रेझ आहे, अनेक देशांमध्ये लीगचे आयोजन केले जाते. यामध्ये अनेक खेळाडूंवर पैशांची बोलू लावून त्याला लीगमध्ये खेळवले जाते. भारतामध्ये त्याचबरोबर जगभरामध्ये सर्वाधिक पैशांची कमाई करणारा इंडियन प्रीमियर लीगची चर्चा संपूर्ण जगामध्ये केली जाते. अनेक दिग्गज खेळाडूंवर या लीगमध्ये करोडोंची बोली लावण्यात येते. त्याचबरोबर काही देशामध्ये T-10 म्हणजेच ओव्हरचा सामना खेळवला जातो यामध्ये सुद्धा मनोरंजक सामने पाहायला मिळतात. T-20 आणि T-10 सारख्या फॉरमॅटमध्ये जबरदस्त यश मिळवल्यानंतर आता क्रिकेट चाहत्यांसाठी Legend 90 लीग सुरू होणार आहे. या लीगबाबत क्रिकेट विश्वात उत्साहाचे वातावरण आहे. या दोन्ही फॉरमॅटमध्ये स्फोटक फलंदाजी केली जाते त्यामुळे चाहत्यांचे मोठ्या प्रमाणात मनोरंजन होते.
कारण पुढच्या महिन्यात लीजंड ९० लीग सुरू होत आहे. ९० चेंडूंच्या या लीगमध्ये जगभरातील क्रिकेट दिग्गज खेळाच्या मैदानात एकत्र येणार असून ही लीग गेम चेंजर ठरणार आहे. त्यात खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवन, सुरेश रैना, न्यूझीलंडचा रॉस टेलर, वेस्ट इंडिजचा लेंडल सिमन्स आणि श्रीलंकेचा अँजेलो परेरा यासारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. या लीगची मोठी गोष्ट म्हणजे ती भारतातून सुरू होत आहे. या लीगमध्ये एकूण सात संघ खेळताना खेळणार आहेत, जिथे फक्त एका गोलंदाजाला चार षटके टाकण्याची परवानगी असेल, तर तीन गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकणार आहेत. यामध्ये पॉवरप्ले पहिल्या चार षटकांसाठी असेल.
लीजंड 90 लीगमध्ये २० किंवा १० ओव्हरचा खेळ नसून यावेळी १५ ओव्हरचा खेळ खेळवला जाणार आहे. अशा फॉरमॅटचे आयोजन भारतीय क्रिकेट इतिहासामध्ये पहिल्यादाच करण्यात आले आहे. ही भारतामध्ये लवकरच सुरु होणार आहे, या लीगमध्ये जे खेळाडू निवृत्त झाले आहेत ते या लीगमध्ये खेळू शकणार आहेत. हे खेळाडू फक्त भारतीय खेळाडू नसणार आहेत जगभरामधील निवृत्त झालेल्या क्रिकेट खेळाडू या लीगमध्ये खेळणार आहेत. या लीगमध्ये सात संघ खेळणार आहेत.
१५० मिनिटांमध्ये हा सामना पूर्ण करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे. या लीगमध्ये ५ गोलंदाज जर संघामध्ये असतील तर त्यामधील फक्त १ गोलंदाज चार ओव्हर टाकू शकतो उर्वरित चार गोलंदाज तीन ओव्हर टाकणार. या सीझनचे आयोजन भारतामध्येच रायपूर येते केले जाणार आहे. या लीगची तारीख देखील घोषित करण्यात आली आहे. ६ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी यादरम्यान या लीगमधील सामने खेळवले जाणार आहेत. यादरम्यान भारताचा क्रिकेट संघाचे कोणतेही सामने नाहीत. चॅम्पियन ट्रॉफीचे सामाने १९ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत.