बोईसर: गवत खरेदी करण्यासाठी ना हरकत दाखला देण्याकरिता लाचेची मागणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्या प्रकरणी ठाणे लाच लुचपत विभागाने कारवाई केली आहे. या प्रकरणी डहाणू तालुक्यातील सायवान ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेविका आणि कंत्राटी लिपिक यांच्या विरोधात कासा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. आरोपी सरपंच व कंत्राटी लिपिक यांना ताब्यात घेण्यात आले आहे तर ग्रामसेविका यांची चौकशी करून नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.
संतापजनक! मावस भावानेच केला तरुणीवर अत्याचार, मावशीच्या नातेवाईकांकडून धमकी, तरुणीने संपावले जीवन
डहाणू तालुक्यातील सायवान ग्रामपंचायत हद्दीत तक्रारदार हे स्थानिक लोकांकडून गवत खरेदी करून डहाणू परिसरातील तबेला, गोठे व इतर पेपर कंपन्यांना पुरवठा करतात. त्यांनी ओले आणि सुके गवत खरेदी करिता ना हरकत दाखला मिळावा यासाठी यांनी सायवन ग्रामपंचायत मध्ये रीतसर अर्ज दिला होता. मात्र ग्रामसभेचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेविका ममता पिंपळे आणि सरपंच विष्णू बोरसा हे तक्रारदार यांच्याकडे १५ हजार रुपयांची मागणी करीत असल्याबाबत तक्रारदार यांनी १३ ऑगस्ट रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे कार्यालय येथे तक्रार दिली होती.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने १३ ऑगस्ट रोजी ग्रामसेविका आणि सरपंच यांनी १८ ऑगस्ट रोजी केलेल्या पडताळणी कारवाई मध्ये दहा हजार रुपये रकमेची लाच मागणी करत असल्याबाबतचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचून ग्रामसेविका व सरपंच यांच्या सांगण्यावरून कंत्राटी लिपिक यशवंत भोये याला १० हजार रुपयांचा स्वीकार करतांना पकडण्यात आले. याप्रकरणी साहेबां ग्रामपंचायतीचे ग्रामसेविका ममता पिंपळे, सरपंच विष्णू बोरसा आणि कंत्राटी लिपिक यशवंत भोये यांच्यावर कासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून ग्रामसेविका ममता पिंपळे यांना कलम ३५ (३) अन्वये नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक शिवराज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद अहिरे, हवालदार रुपेश पाटील, सुनील पवार, विजया सुरवाडे यांनी ही कारवाई केली.
पिंपरी – चिंचवडमध्ये बेकायदा पिस्तुलांचा वापर
पुणे मुंबई महामार्गावर घोरावडेश्वर मंदिराच्या पायथ्याजवळ करण्यात आली आहे. एका तरुणाला पिस्तुलासह पकडण्यात आले आहे. सोहम सागर शिंदे (२१, जांभुळगाव, मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस शिपाई प्रकाश जाधव यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहमच्या ताब्यात ७१ हजर रुपये किमतीची दोन देशी बनावटीची गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे विनापरवाना आढळून आली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करत आहेत.