
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
लखनऊ सुपर जायंट्स संघ २०१२ मध्ये या लीगमध्ये सामील झाला. गेल्या चार हंगामांमध्ये, या संघाला एकदाही अंतिम फेरीत पोहोचता आलेले नाही. IPL 2025 मध्ये बरेच बदल झाले होते. या संघाची धुरा नव्या कर्णधाराकडे म्हणजेच ऋषभ पंतकडे सोपवण्यात आली होती. तसेच मोठ्या प्रमाणात संघात बदल करण्यात आले होते. आणि या सगळ्या बदलांनंतर कोचिंग स्टाफसह मैदानात उतरला होता; मात्र, या बदलांचे रूपांतर सुधारलेल्या कामगिरीत होऊ शकले नाही. संघाला प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नाही आणि ते सातव्या स्थानावर राहिले. कर्णधार ऋषभ पंत फलंदाज आणि कर्णधार या दोन्ही भूमिकांमध्ये आपली छाप पाडण्यात अपयशी ठरला. त्याचप्रमाणे, मार्गदर्शक (Mentor) झहीर खान यांनाही आपली छाप पाडता आली नाही. मात्र 2026 मध्ये कमाल दाखवतील हीच अपेक्षा आहे.
#WATCH | Ayodhya, UP: IPL team Lucknow Super Giants visited the Ram Mandir to seek blessings. Owner, Lucknow Super Giants, Sanjeev Goenka says, “… Offering prayers to Lord Ram is never enough, and with the IPL season about to begin, all the players offered prayers at the temple… pic.twitter.com/5U0839kX8p — ANI (@ANI) March 21, 2026
IPL 2026 साठी, LSG पुन्हा एकदा नवीन कोचिंग टीम आणि अनेक नवीन खेळाडूंसह मैदानात उतरत आहे. संघाच्या जर्सी आणि लोगोमध्येही बदल करण्यात आले आहेत. आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या आणि आपले पहिले विजेतेपद पटकावण्याच्या ठाम इराद्याने LSG या हंगामात प्रवेश करत आहे.
या हंगामात, LSG संघ कर्णधार ऋषभ पंत, निकोलस पूरन, एडन मार्कराम, मिचेल मार्श, मोहम्मद शमी, मयंक यादव, मोहसीन खान आणि दिग्विजय राठी यांसारख्या खेळाडूंकडून सामना जिंकून देणाऱ्या कामगिरीची अपेक्षा करेल. मोहम्मद शमी या हंगामात पहिल्यांदाच LSG कडून खेळणार आहे. मागील हंगामात तो SRH संघाचा भाग होता; मात्र लिलावापूर्वी त्या फ्रँचायझीने त्याला release केले होते. शमीच्या कामगिरीवरही सर्वांचे लक्ष असेल, कारण तो राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी तयार आहे.