(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
एका अहवालानुसार, निवड समितीने आधीच 20 खेळाडूंची शॉर्टलिस्ट तयार केली आहे. त्यामुळे आयपीएलमध्ये चमकून एखाद्या नव्या खेळाडूला थेट वर्ल्डकपसाठी संधी मिळेल, अशी शक्यता यानंतर थोडी कमीच वाटते आहे. कारण संघ व्यवस्थापन याच 20 खेळाडूंवर लक्ष केंद्रित करून अंतिम 15 जणांची निवड करणार असल्याचं बोललं जात आहे.
अधिकृत यादी समोर आलेली नसली तरी अलीकडील वनडे मालिकांमधील कामगिरी पाहता अंदाज बांधणं अवघड नाही. नव्या कर्णधारपदी शुभमन गिल आणि उपकर्णधार म्हणून श्रेयस अय्यरची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. अनुभवी खेळाडूंमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीचाही समावेश होण्याची दाट शक्यता आहे. दोघांनीही वनडे खेळण्याची इच्छा व्यक्त केली जात आहे. त्याची कामगिरीही प्रभावी राहिली असल्यामुळे नेमकं काय होतं हे पाहावं लागेल. याशिवाय संघाचे प्रमुख आधारस्तंभ असलेले केएल राहुल, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव हेही जवळपास निश्चित मानले जात आहेत.
वेगवान गोलंदाजांमध्ये बुमराहसोबत मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा आणि हर्षित राणा यांचा समावेश होऊ शकतो. मात्र या सगळ्यामध्ये मोहम्मद शमी याला स्थान मिळणं कठीण झालं आहे. स्पिन मध्ये कुलदीपसोबत वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांची नावे पुढे येत आहेत. अनुभवी रवींद्र जडेजा यांचाही विचार होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. कारण त्याचा अनुभव महत्त्वाच्या क्षणांना मॅच फिरवण्यासाठी उपयुक्त ठरतो.
बॅकअप ओपनर म्हणून यशस्वी जैस्वाल आणि अभिषेक शर्मा यांना संधी मिळू शकते. पण सर्वात मोठी लढत विकेटकीपरसाठी आहे. कारण सध्या टीम इंडियामध्ये मोठे दावेदार आहेत. ऋषभ पंत, ईशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी स्पर्धा पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला पंत आणि ईशान याला आघाडी मिळण्याची शक्यता आहे.
शुभमन गिल (कर्णधार), श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल, ऋषभ पंत, ईशान किशन, अभिषेक शर्मा, रवींद्र जडेजा, संजू सॅमसन.






