
भारतीय क्रिकेटमधील नवोदित आणि युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी सध्या आपल्या धडाकेबाज फलंदाजीमुळे सतत चर्चेत आहे. अवघ्या 15 व्या वर्षी त्याने सर्वांना चकित केले आहे. त्याची प्रतिभा पाहता भारताचे माजी क्रिकेट प्रशासक आणि ज्येष्ठ क्रिकेट अभ्यासक मकरंद वाइंगणकर यांनी बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला एक महत्वाचा सल्ला दिला आहे.
झुकेगा नही साला! Vaibhav Suryvanshi ने घातला धुमाकूळ; ICC रॅंकिंगमध्ये थेट 230…, वाचा सविस्तर
मकरंद वायंगणकर यांनी बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला एक सल्ला दिला आहे. 2026 च्या वर्ल्डकपच्या आधी भारताने आपली ताकद वाढवली पाहिजे. तसेच बेंच स्ट्रेंथ देखील मजबूत करणे आवश्यक आहे. वैभव सूर्यवंशीसारख्या अत्यंत गुणवान आणि आक्रमक फलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळणे आवश्यक आहे.
Vaibhav Sooryavanshi should be fast tracked for 2027 World Cup. With 14 months to go Indian selectors must work on the bench strength. No better talented batsman than this modern Sanath Jaysuriya who in the 1996 World Cup damaged the reputation of top quality bowlers — Makarand Waingankar (@wmakarand) July 25, 2026
यासाठी त्याला लवकरात लवकर एकदिवसीय संघात संधी दिली गेली पाहिजे. त्यामुळे तर २०२७ च्या वर्ल्डकपपर्यंत तो भारतीय संघातील एक महत्त्वाचा आणि परिपक्व फलंदाज म्हणून तयार होऊ शकतो.
Vaibhav Suryvanshi ने घातला धुमाकूळ
झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन टी 20 सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीने 151 रन्स केल्या आहेत. या सिरिजमध्ये त्या दोन अर्धशतके लगावली आहेत. या कामगिरीच्या जोरावर वैभव सूर्यवंशीने प्लेयर ऑफ द सिरिज आणि प्लेयर ऑफ द मॅच हे दोन पुरस्कार आपल्या नावावर केले आहेत. 15 व्या वर्षी हा मान मिळवणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.