Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MS Dhoni Retirement: ‘…तो क्षण अजूनही आठवतो’ धोनीच्या निवृत्तीवर क्रिकेटच्या ‘देवा’ची भावूक पोस्ट

MS Dhoni Retirement: महेंद्रसिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार समजला जातो. कर्णधार म्हणून त्याने अनेक महत्वाचे सामने भारताला जिंकवून दिले आहेत. विकेट्सच्या मागून आखलेली रणनीती कायमच यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 19, 2026 | 02:12 PM
सचिन तेंडुलकरची धोनीसाठी भावूक पोस्ट

सचिन तेंडुलकरची धोनीसाठी भावूक पोस्ट

Follow Us
Follow Us:
  • सचिन तेंडुलकरची धोनीसाठी भावूक पोस्ट
  • धोनीने जाहीर केली आयपीएलमधून निवृत्ती 
  • सीएसकेसाठी मेंटॉर म्हणून पाहणार काम 
MS Dhoni Retirement: नुकतीच भारताचा आणि सीएसकेचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने नुकतीच आयपीएलमधून देखील थेट निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात मोठी खळबळ उडाली आहे. आता महेंद्रसिंह धोनी सीएसकेसाठी मेंटॉर म्हणून काम करणार आहे. मात्र धोनीने निवृत्ती घेताच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने आपल्या खास मित्रांसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टबाबत जाणून घेऊयात.

भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्र सिंह धोनी याने आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. धोनीच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर जगभरातील क्रिकेटपटू, चाहते आणि विश्लेषकांकडून प्रतिक्रिया समोर येत आहेत. आता ‘क्रिकेटचा देव’ सचिन तेंडुलकरने देखील धोनीसाठी पोस्ट केली आहे.

MS Dhoni Retirement: ‘हेलिकॉप्टर’ शॉट कायमचा थंड; लाडक्या ‘थाला’ने ठोकला रामराम; IPL मधून निवृत्त

काय म्हणाला सचिन तेंडुलकर?

बांग्लादेशमध्ये धोनीला फलंदाजी करताना पाहण्याचा क्षण मला अजूनही आठवतो. त्याच्या पॉवर हिटिंगमध्ये काहीतरी खास आहे असे मी त्यावेळेस सौरव गांगुलीला सांगितले होते. तिथून आतापर्यंत धोनीने केलेला प्रवास हा अत्यंत अद्भुत आहे. तुझ्यासाह ड्रेसिंग रूम शेअर करणे आणि भारतीय क्रिकेटमधील काही सर्वात अविस्मरणीय क्षणांचा भाग असणे हा खरोखरच खूप जास्त आनंदाचा भाग आहे. तू काहीतरी खास करशीलच असा मला विश्वास होताच. मात्र तू त्यापेक्षा मोठे यश मिळवलेस. तू भारतीय क्रिकेटला तुझे सर्वोत्तम दिले आहेस. हा प्रवास तुझ्यासोबत अनुभवता आला, याचा मनापासून आनंद आहे. वेल प्लेड, एमएस!

महेंद्रसिंह धोनी हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार समजला जातो. कर्णधार म्हणून त्याने अनेक महत्वाचे सामने भारताला जिंकवून दिले आहेत. विकेट्सच्या मागून आखलेली रणनीती कायमच यशस्वी झाल्याचे दिसून आले आहे. टी 20 वर्ल्डकप मध्ये बांग्लादेशविरुद्धचा कमी रन्सचा सामना देखील धोनीच्या अचूक रणनीतीमुळे भारताने जिंकला होता. तसेच 2011 मध्ये तब्बल अनेक वर्षांनी भारतीय संघाने आयसीसी वर्ल्डकप जिंकला होता. 1983 नंतर 2011 मध्ये 28 वर्षांनी भारताने वर्ल्ड कप जिंकला होता.

MS Dhoni: CSK चा नवा डाव! धोनी मेंटॉर, तर झहीर खान सांभाळणार कोचची जबाबदारी?

एम.एस. धोनीचे आयपीएल रेकॉर्डस

एकूण सामने – 278 सामने
एकूण रन्स – 5,439 रन्स
अर्धशतके – 24
सर्वाधिक रन्स – 84
आयपीएल विजेतेपद – सीएसकेला 5 वेळेस विजेतेपद

💡

Frequently Asked Questions

  • Que: महेंद्रसिंह धोनी आता चेन्नई सुपर किंग्समध्ये कोणती भूमिका बजावणार आहे?

    Ans: आयपीएलमधून निवृत्ती घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) संघासाठी मेंटॉर म्हणून काम करणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • Que: सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यातील नाते कसे आहे?

    Ans: सचिन तेंडुलकर आणि महेंद्रसिंह धोनी यांच्यात भारतीय क्रिकेटमधील वरिष्ठ आणि कनिष्ठ खेळाडूंसोबतच परस्पर आदराचे आणि मैत्रीपूर्ण नाते आहे.

Web Title: Master blaster sachin tendulkar share emotional post to ms dhoni retirement csk tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 02:12 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • M.S. Dhoni
  • Sachin Tendulkar

संबंधित बातम्या

MS Dhoni: CSK चा नवा डाव! धोनी मेंटॉर, तर झहीर खान सांभाळणार कोचची जबाबदारी?
1

MS Dhoni: CSK चा नवा डाव! धोनी मेंटॉर, तर झहीर खान सांभाळणार कोचची जबाबदारी?

MS Dhoni Retirement: ‘थाला’चा भावूक करणारा व्हिडिओ; ‘हे’ गाणं लावत म्हणाला, ‘… चुकीचे ठरवले’
2

MS Dhoni Retirement: ‘थाला’चा भावूक करणारा व्हिडिओ; ‘हे’ गाणं लावत म्हणाला, ‘… चुकीचे ठरवले’

MS Dhoni IPL Records : नेहमीच चेन्नईसाठी तारणहार ठरलाय एम. एस. धोनी; रेकॉर्ड पहाल तर थक्क व्हालं
3

MS Dhoni IPL Records : नेहमीच चेन्नईसाठी तारणहार ठरलाय एम. एस. धोनी; रेकॉर्ड पहाल तर थक्क व्हालं

Sachin Tendulkar : सचिनच्या पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास! वानखेडेवर ‘बॅटोग्राफी’तून ऐतिहासिक बॅट पाहण्याची संधी
4

Sachin Tendulkar : सचिनच्या पहिल्या बॅटपासून अखेरच्या कसोटीपर्यंतचा प्रवास! वानखेडेवर ‘बॅटोग्राफी’तून ऐतिहासिक बॅट पाहण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.