
MI vs DC, WPL live score: Mumbai thrashed Delhi! Kaur's army defeated Jemimah's team by 50 runs.
MI vs DC, WPL live score : महिला प्रीमियर लीग २०२६ चा तिसरा सामना शनिवारी नवी मुंबईत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळला गेला. नवी मुंबईतील डॉ. डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा ५० धावांनी पराभव करत या हंगामात विजयाचे खाते उघडले. नाणेफेक गमावणाऱ्या मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ४ गडी गमावून १९५ धावा उभ्या केल्या. धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा संघ दबावाखाली गडगडला आणि त्यांना १४५ धावांवर सर्वबाद झाला.
मुंबईने दिलेल्या १९५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सुरुवात खूपच वाईट झाली. दिल्लीचा निम्मा संघ ५० धावांच्या आतच माघारी गेला होता. दिल्लीच्या चिनेल हेन्री वगळता एकही फलंदाज मैदानावर तग धरू शकला नाही. चिनेल हेन्रीने ३३ चेंडूत ५६ धावा केल्या. यामध्ये तिने ५ चौकार आणि ३ षटकार लगावले. शफाली वर्मा ८, लिझेल ली १०, लॉरा वोल्वार्ड ९, जेमिमाह रॉड्रिग्स १, मारिझान कॅप १०, निकी प्रसाद १२, स्नेह राणा ११, मिन्नू मणी ७, नंदनी शर्मा ० धावा करून बाद झाले तर श्री चरणी १० धावांवर नाबाद राहिली. मुंबईकडून निकोला केरी आणि अमेलिया केर यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेतल्या आणि नॅट सायव्हर-ब्रंटने २ विकेट्स तर शबनीम इस्माईल आणि संस्कृती गुप्ता यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
हेही वाचा : ICC Women World Cup 2025 : सुनील गावस्कर यांनी केली वचनपूर्ती! जेमिमा रॉड्रिग्जला दिली ‘खास’ भेट; पहा VIDEO
दिल्ली कॅपिटल्स महिला (प्लेइंग इलेव्हन): शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (क), मारिझान कॅप, निकी प्रसाद, चिनेल हेन्री, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): अमेलिया केर, जी कमलिनी (डब्ल्यू), नॅट सायव्हर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (क), निकोला केरी, सजीवन सजना, अमनजोत कौर, पूनम खेमनार, त्रिवेणी वसिष्ठ, शबनीम इस्माईल, संस्कृती गुप्ता