MI vs GT: Gujarat player's brilliance in Mumbai's victory! He missed Rohit-Surya's catch and also gave away his own wicket.., watch video
MI vs GT : आयपीएल २०२५ मध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सचा २० धावांनी पराभव केला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या अर्धशतकाच्या जोरावर संघाने २२८ धावा केल्या. प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्स २०८ धावा करू शकला. परिणामी गुजरातला पराभवाचा सामना करावा लागला आणि गिलसेनेला स्पर्धेतून बाहेर लागले. तर पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सने सामना जिंकला आणि दुसऱ्या क्वालिफायरमध्ये प्रवेश केला आहे. या सामन्यात गुजरातच्या चाहत्यांनी कुसल मेंडिसवर जोरदार टीका केली आहे. नेमकं काय घडलं याबाबत जाणून घेऊया.
क्रिकेट मैदानावर अनेकदा फलंदाज विचित्र पद्धतीने बाद होत असतात. कधी गोलंदाजाच्या उत्कृष्ट चेंडूमुळे तर कधी क्षेत्ररक्षकाच्या सर्वोत्तम प्रयत्नांमुळे फलंदाजाला मंगहरी जावे लागते. पण आयपीएल २०२५ च्या एलिमिनेटर सामन्यात कुसल मेंडिस ज्या प्रकारे बाद झाला ती गोष्ट म्हणजे आत्महत्याच म्हणावी लागेल.
मुंबईविरुद्धच्या महत्त्वाचा सामन्यात मेंडिसने आपल्या डावाची सुरवात चांगली झाली होती. तो चांगल्या फॉर्ममध्ये देखील दिसत होता. पण, त्यानंतर त्याने केलेली चूक मात्र क्रिकेटच्या मैदानात क्वचितच पाहायला मिळते. विशेषतः आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून अशी चूक करणे अपेक्षित मानले जात नाही.
मुंबई इंडियन्सने दिलेल्या २२९ धावाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात वाईट झाली. कर्णधार शुभमन गिल फक्त एक धाव काढत ट्रेंट बोल्टचा शिकार ठरला. त्यानंतर कुसल मेंडिस फलंदाजीसाठी क्रीजवर आला.
HITWICKET IN THE ELIMINATOR. 🤯 – Kusal Mendis just lost his wicket due to hitting the stumps. 😱pic.twitter.com/hwfMEqRdYT — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 30, 2025
मेंडिसने चांगली सुरुवात देखील केली, परंतु सातव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर मेंडिसच्या हातून मोठी चूक झाली. सँटनरच्या चेंडूवर स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न करताना मेंडिसला तोल सांभाळता आला नाही आणि त्याचा पाय स्टंपवर जाऊन आदळला. यात त्याला माघारी परतावे लागले.
एवढेच नाही तर या सामन्यात त्याने दोन मोठ्या खेळाडूंचे झेल सोडले. ज्यामध्ये रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचाही समावेश आहे. जर त्याने रोहितचा झेल सोडला नसता तर मुंबईची धावसंख्या २०० च्या पुढे जाऊ शकली नसती. रोहित शर्माच्या(५० चेंडू ८१ धावा) शानदार खेळीमुळेच मुंबईने गुजरातसमोर मोठे लक्ष ठेवता आले.
हेही वाचा : MI vs GT : ‘हिटमॅन’ ची गाडी सुसाट! IPL प्लेऑफमध्ये Rohit Sharma ने रचला इतिहास; मोडला स्वतःचाच विक्रम..
३० मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये एलिमिनेटर सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने गुजरातचा २० धावांनी पराभव केला. या पराभवाने गुजरात टायटन्सचे या स्पर्धेतील प्रवासाचा शेवट झाला आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या या महत्त्वाच्या सामन्यात मुंबईचे सलामीवीर जॉनी बेअरस्टो आणि रोहित शर्मा यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २२८ धावा केल्या. प्रत्युउत्तरात गुजरात टायटन्स २०८ धावा करू शकला. गुजरातकडून साई सुदर्शनने अर्धशतकी पारी खेळली परंतु व्यर्थ गेली.