MI vs GT: Who will dominate the field? Mumbai and Gujarat face each other today, know the probable playing-11 with head-to-head record
MI vs GT : आयपीएल २०२५ मध्ये, आज ६ मे रोजी ५६ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची स्पर्धा बघायला मिळणार आहे. अशा परिस्थितीत, हा सामना खूप रोमांचक होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या हंगामात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे दोघेही संघ चांगल्या फॉर्ममधून जात आहेत. अशा परिस्थितीत, आजचा सामना जो संघ जिंकेल तो थेट प्लेऑफसाठी आपला दावा मजबूत करेल. पॉइंट टेबलमध्ये मुंबई तिसऱ्या आणि गुजरात चौथ्या स्थानावर आहे.
हेही वाचा : MI vs GT : Gujrat Titans संघासाठी खुशखबर! मुंबईविरुद्ध ‘हा’ तेजतर्रार गोलंदाज करणार पुनरागमन..
खेळपट्टी रिपोर्ट
वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी फलंदाजांसाठी पोषक मानली जाते. येथील पृष्ठभागावर चांगली उसळी आहे, ज्यामुळे चेंडू बॅटवर सहज यायला मदत होते आणि शॉट्स खेळणे सोपे होऊन जाते. यामुळेच या मैदानावर अनेकदा मोठ्या धावसंख्या उभारल्या गेल्या आहेत. तथापि, या खेळपट्टीवरून फिरकी गोलंदाजांना फारशी मदत मिळताना दिसत नाही. त्याच वेळी, गवताच्या कमतरतेमुळे, वेगवान गोलंदाजाना देखील फार काही मदत मिळत नाही.
या मैदानावर नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आकडेवारीवरून असे स्पष्ट होते की, बहुतेक कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतात. जेणेकरून दुसऱ्या डावात दवाचा फायदा घेऊन लक्ष्याचा पाठलाग करणे अधिक सोपे जाते.
मंगळवारी मुंबईत पावसाची ७० टक्के शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा परिस्थितीत पाऊस सामन्याची मजा बिघडवू शकतो. वारा ताशी १९ किलोमीटर वेगाने वाहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
आतापर्यंत आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात एकूण सहा सामने खेळवण्यात आले आहेत. त्यापैकी गुजरातने चार सामने आपल्या नावावर केले आहेत. तर मुंबईला फक्त दोन सामने जिंकता आले आहेत. गेल्या तीन सामन्यांची आकडेवारी बघितली तर मुंबईला प्रत्येक वेळी गुजरातविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला आहे. एकूणच गुजरातचा दबदबा दिसून येत आहे.
हेही वाचा : IPL २०२५ : ‘विराट जोकर तर त्याचे चाहते दोन पैशांचे…’, Rahul Vaidya ने किंग कोहलीवर पुन्हा केली आगपाखड..
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, शेरफेन रदरफोर्ड, जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, आर साई किशोर, रशीद खान, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा.
मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार), रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), रोहित शर्मा, विल जॅक्स, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, दीपक चहर, कर्ण शर्मा, नमन धीर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह.